काही दिवसांपूर्वी अॅप्पलने आपले दोन नवीन स्मार्टफोन्स आयफोन 6S आणि 6S प्लसला भारतात लाँच केले होते. त्यामुळे त्यांच्या चर्चेला पुर्णविराम मिळतो न मिळतो, तोच पुढील वर्षी लाँच होणा-या नवीन आयफोन 7 च्या चर्चांना उधाण आलय. असे सांगितले जातय की, ह्या स्मार्टफोनला आणखी बारीक बनविण्यासाठी स्मार्टफोन ऑडियो जॅक हटविला जाऊ शकतो. हा ऑडियो जॅक 3.5mm चा असू शकतो. जर अॅप्पल असे करत असेल, तर आयफोन 7 ला एक आकर्षक आणि स्लिम लूक मिळेल.
जपानच्या एका प्रसिद्ध ब्लॉगमध्ये असा दावा केला गेला आहे की, मागील आयफोनपेक्षा आयफोन 7 ला 1mm बारीक बनविले जाईल आणि त्यासाठी ह्याच्या 3.5mm चे ऑडियो जॅक हटविले जातील. त्याचबरोबर असेही सांगितले जातय की, ह्याला बारीक ऑडियो जॅकसह बाजारात आणले जाऊ शकते.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनच्या अफवांवरुन असे सांगितले जातय, ह्या स्मार्टफोनमध्ये 3GB ची रॅम असू शकते. त्याचबरोबर ह्यात 5.5 इंचाची आकर्षक डिस्प्ले असू शकते, जशी आताच्या आयफोन्समध्ये होती. ह्याचाच अर्थ ह्याला 3D टच असू शकतो. त्याशिवाय ह्यात उत्कृष्ट कॅमेरासुद्धा असू शकतो. तसेच कंपनी एक ४ इंचाचा आणखी एक आयफोनसुद्धा लाँच करु शकते. आणि हा आयफोन 6C च्या नावाने लाँच केले जाऊ शकते.