मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पलच्या नवीन येणा-या स्मार्टफोनविषयी सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार हा नवीन आयफोन 6C ला २०१६ मध्ये लाँच करेल. अॅप्पल आयफोन 6Cमध्ये 4 इंचाची डिस्प्ले असेल. हा फोन कंपनीच्या मागील आयफोन 5S शी बराच मिळता-जुळता आहे.
सध्यातरी कंपनीद्वारा ह्या स्मार्टफोनविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र हा २०१६ मध्ये लाँच होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन 6C मध्ये 4 इंचाची डिस्प्ले असेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन A8 चिपसेटने सुसज्ज असेल. त्याशिवाय केजीआयच्या एनालिस्ट मिंग ची क्यूच्या म्हणण्यानुसार आयफोन 6C पुढील वर्षी लाँच केल्यानंतर वर्षाच्या शेवटपर्यंत हा २० ते ३० मिलियनपर्यंत विकला जाईल. हा फोन २०१६ च्या सुरुवातीलाच लाँच होईल.
ह्याआधी ह्या स्मार्टफोनशी संबंधित काही लीक्स समोर आले होते. ह्या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटुथ आणि वायफाय फीचर दिले आहे.
ही कंपनी बहुतकरुन सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये आपले फोन लाँच करते आणि वर्षात एकदाच फोन लाँच करते.