एका रिपोर्टनुसार, अॅप्पल पुढील ३ महिन्याच्या आत १३ इंच आणि १५ इंचाचा स्क्रीन असलेला नवीन मॅकबुक लाँच करु शकतो. रिपोर्टमध्ये अशीही माहिती दिली गेली आहे, की सध्याच्या मॅकबुक एयर मॉडलची तुलनेमध्ये नवीन मॅकबुक मॉडल जास्त पातळ असतील.
ही माहिती डिजिटाइम्स ने दिली आहे. ह्या रिपोर्टमध्ये असे सांगितले गेेले आहे की, आसूस, डेल आणि लेनोवोमध्ये त्याचवेळी अल्ट्रा-थिन नोटबुक लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर अशीही माहिती दिली आहे की, १२ इंचाच्या मॅकबुकसारखा नवीन मॉडलमध्ये USB टाइप-C पोर्टसुद्धा असू शकतो. १३ इंच आणि १५ इंचाच्या स्क्रीन असलेल्या मॅकबुकचे डिझाईन मागील वर्षी लाँच झालेल्या १२ इंचाच्या मॅकबुकसारखे असेल.
तसेच अशीही बातमी मिळत आहे की, अॅप्पल आपली पुर्ण मॅक सीरिज-मॅकबुक, मॅकबुक प्रो, मॅक प्रो, मॅकबुक एयर, आयमॅक, मॅक मिनीच्या नवीन मॉडल सादर करण्याची योजना बनवित आहे.
तसेच दुस-या रिपोर्ट्समध्ये अशी माहिती दिली गेली आहे की, ह्या नवीन कंम्प्यूटिंग डिवाइसमध्ये सिक्स जेन इंटेल ‘स्कायलेक’ कोर प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा – 2GB रॅमने सुसज्ज असलेले दोन उत्कृष्ट स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – हे स्मार्टफोन्स देणार आयफोन SE ला कडक टक्कर