Apple ने आता iPhone 6s ची मॅन्युफॅक्चरिंग भारतात केली सुरू

Apple ने आता iPhone 6s ची मॅन्युफॅक्चरिंग भारतात केली सुरू
HIGHLIGHTS

बंगळुरू मधील Winstron च्या फेसिलिटी मध्ये iPhone 6s मॅन्युफॅक्चर केला जात आहे, जिथे SE पण बनवला जातो.

Apple started manufacturing of iPhone 6s locally in India: भारतात iPhones ची किंमत जास्त असण्याचे सर्वात मोठे कारण याचा आयात खर्च आहे. हा खर्च कमी करण्यासाठी Apple ने Iphone Se ची मॅन्युफॅक्चरिंग भारतातच सुरू केली होती आणि आता iPhone 6s साठी पण कंपनी हाच रस्ता अवलंबत आहे. बंगळुरू मधील Winstron च्या फेसिलिटी मध्ये iPhone 6s मॅन्युफॅक्चर केला जात आहे, जिथे SE पण बनवला जातो. 

आता प्रोडक्शन सुरू झाले आहे त्यामुळे Apple ला डिमांड बघून काही यूनिट आयात करावे लागू शकतात. पण एका एग्जीक्यूटिव ने सांगितले, “मेड इन इंडिया” यूनिट्स लवकरच स्टोर्स मध्ये दिसतील.” निराशाजनक बाब ही आहे की किंमतीतील कपाती बद्दल अजुन पर्यंत कोणतीही माहिती समोर आली नाही. 

रिपोर्ट नुसार Apple अन्य काही मॉडेल्स पण लोकली मॅन्युफॅक्चर करण्याची तयारी करत आहे. काही iPhones चे ट्रायल प्रोडक्शन लवकरच सुरू होऊ शकते. याआधी एप्रिल मध्ये सुरू झालेल्या ट्रायल प्रोडक्शन मध्ये iPhone 6 आणि 6s कवर करण्यात आले होते. Counterpoint च्या रीपोर्ट नुसार या ट्रायल ने भारतात एकूण 33% सेल झाला होता. 

Apple iPhone 6s चे फीचर्स पहाता यात 4.7-इंचाचा रेटिना HD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 2GB चा रॅम आणि 32GB ची इंटरनल स्टोरेज आहे. विशेष लक्षात असू दे की, आयफोन मध्ये स्टोरेज वाढवण्याचा ऑप्शन मिळत नाही. यासोबत या फोन मध्ये 12 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo