मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अॅप्पलने आपला IOSचा नवीन व्हर्जन IOS 9.2 लाँच केले आहे. ह्यात ह्याआधी अॅप्पलचे डिवायसेस IOS 9 वर काम करत होते. IOS 9.2 मध्ये यूजर इंटरफेसमध्ये खूप जास्त बदल केले गेले नाही. तथापि, अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत.
कंपनीनेे दावा केला आहे की, IOS 9.2 जास्त सुरक्षित आहे. त्याचबरोबर ह्यात IOS 9 मध्ये असलेल्या उणीवा भरुन काढल्या आहेत.
ह्यात अनेक फीचर्स जोडले गेले आहेत.अॅप्पलने IOS ९.२ अपडेटमध्ये अॅप्पल म्यूजिकसह काही वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत. आता आपण अॅप्पलच्या म्यूजिक सर्विसमध्ये गाणी ऑफलाइन सेव्ह करु शकतात. अॅप्पल म्यूजिकमध्ये आता आपण नवीन प्ले लिस्ट बनवू शकता. त्याचबरोबर ह्यात असलेल्या न्यूज अॅपलासु्द्धा नवीन बदलांसह आणले आहे.
त्याचबरोबर ह्यात मेल ड्रॉप फीचरचा सुद्धा समावेश केला गेला आहे. तसेच ह्यात USB कॅमेरा अॅडप्टर सपोर्ट आहे.