अॅप्पल ने या वर्षी तीन नवीन स्मार्टफोन्स IPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR लॉन्च केले आहेत ज्यांची प्री-बुकिंग आता सुरू झाली आहे. आयफोन फॅन्सना या वर्षी तीन नवीन पर्याय वेगवेगळ्या प्राइस टॅग सह उपलब्ध झाले आहेत. iPhone XS आणि iPhone XS Max 28 सप्टेंबर पासून भारतात सेल साठी येईल. आज या दोन्ही फोन्स साठी प्री-ऑर्डर्स सुरू झाल्या आहेत.
जर तुम्ही नवीन Apple iPhone XS आणि XS Max विकत घेऊ इच्छित असाल तर एयरटेल, रिलायंस जियो आणि फ्लिपकार्ट वर या फोन्स साठी प्री-ऑर्डर्स सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर अॅप्पल च्या काही प्रीमियम रीसेलर्स आणि ऑफिशियल स्टोर्स वर पण फोन प्री-ऑर्डर केले जाऊ शकतात.
ग्राहकांना पेमेंट किंवा EMI प्लान पैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल आणि त्यांनंतर त्यांना इन-स्टोर-पिक-अप किंवा होम डिलीवरी पर्यायांपैकी कोणताही एक निवडावा लागेल. आयफोन्सची डीलिवरी 28 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल आणि फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केल्यास काही ठिकाणी 29 सप्टेंबरला डिलीवरी करण्यात येईल.
एयरटेल आणि जियो द्वारा करा प्री-ऑर्डर
एयरटेल किंवा जियो द्वारा बुकिंग करण्यासाठी Airtel.in किंवा Jio.com वर जा, तिथे तुम्हाला एक बॅनर दिसेल ज्यावर क्लिक करताच तुम्ही नवीन अॅप्पल आयफोन्स प्री-ऑर्डर करू शकाल. फ्लिपकार्ट वर पण अशाच प्रकारे डिवाइसेज लिस्ट करण्यात आले आहेत आणि एका रेगुलर परचेस प्रमाणेच ऑर्डर केले जाऊ शकतात. पेमेंट आणि डिलीवरी एड्रेस ची माहिती सबमिट केल्यानंतर तुमची ऑर्डर सेट होईल आणि डिवाइस अधिकृतरीत्या उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला मिळेल.
नवीन Apple iPhone XS आणि iPhone XS Max आता पर्यंतचे कंपनीचे सर्वात महाग डिवाइसेज आहे, iPhone XS (64GB) ची किंमत Rs 99,900 पासून सुरू होते आणि iPhone XS Max (512GB) ची किंमत Rs 144,900 पर्यंत आहे. हे दोन्ही फोन्स हार्डवेयर च्या बाबतीत एक सारखे आहेत पण बॅटरी आणि स्क्रीन साइज मध्ये फरक आहे. iPhone XS मध्ये 5.8 इंचाची AMOLED स्क्रीन आहे आणि iPhone XS Max मध्ये 6.5 इंचाची AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे.