Apple 12 सप्टेंबर रोजी म्हणजे आज आपली नवीन सीरीज म्हणजेच iPhone 15 लाँच करणार आहे. या सिरीजबाबत टेक विश्वात अनेक चर्चा आणि बातम्या सुरु आहेत. मात्र, iPhone लव्हर्ससाठी एक महत्त्वाची बातमी पुढे येत आहे. असे म्हटले जात आहे की, iPhone 15 सिरीज लाँच झाल्यानंतर iPhone 13 Mini बंद होऊ शकतो. Apple iPhone 15 सिरीज लाँच केल्यानंतर किमान चार फोन बंद करणार असल्याची बातमी आहे. ज्यामध्ये iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 12 आणि iPhone 13 Mini यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनने X ( ट्विटर) प्लॅटफॉर्मवर सांगितले आहे की, iPhone 13 Mini चा स्टॉक कमी आहे. याशिवाय, Apple चे अमेरिकेतील ऑनलाइन स्टोअर iPhone 13 Mini च्या काही मॉडेल्ससाठी अंदाजे 2-3 आठवड्यांचा डिलिव्हरी वेळ घेत आहे. तर वरसांगितल्याप्रमाणे इतर मॉडेल्ससाठी 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी सांगितला जात आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या वर्षी iPhone 14 लाँच केल्यानंतर कंपनीने iPhone 11 आणि iPhone 12 Mini बंद केले. मात्र, कंपनीने हे मॉडेल्स बंद होण्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
iPhone 13 लाइनअपमध्ये iPhone 13, 13 Mini, 13 Pro आणि 13 Pro Max या चार फोनचा समावेश होता. iPhone 13 ची किंमत 79,900 रुपये इतकी ठेवण्यात आली होती. याचा बेस 128GB व्हेरिएंटसाठी आहे, तर iPhone 13 प्रो 1,19,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला. लॉन्चच्या वेळी iPhone 13 Pro Max ची किंमत 1,29,900 रुपये होती, तर iPhone 13 Mini ची किंमत 69,900 रुपये होती.
iPhone 13 सिरीज Apple च्या A15 Bionic प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोन 6.1-इंच स्क्रीनसह येतो. हा फोन रेड, स्टारलाइट, मिडनाईट, ब्लु आणि पिंक अशा पाच कलर्समध्ये लाँच करण्यात आला आहे.