असे बोलले जात आहे की 2018 मध्ये येणारे Apple iPhones 12 सप्टेंबरला लॉन्च केले जाऊ शकतात. तसेच प्री-आर्डर ची प्रक्रिया 14 सप्टेंबरला सुरू केली जाऊ शकते, ही माहिती जर्मनीच्या एका वेबसाइट Macerkopf.de च्या माध्यमातून समोर येत आहे. याआधी पण याबद्दल माहिती समोर आली आहे की या वर्षी कंपनी म्हणजेच अॅप्पल कडून तीन नवीन iPhones लॉन्च केले जाऊ शकतात. यातील दोन OLED डिस्प्ले सह लॉन्च केले जाऊ शकतात, त्याचबरोबर अजून एक अफोर्डेबल किंमतीत येणारा फोन म्हणून LCD डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो.
या रिपोर्ट नुसार या प्री-आर्डर बद्दलची माहिती दोन वेगवेगळ्या जर्मन कॅरियर्स च्या माध्यमातून मिळाली आहे. पण अॅप्पल कडून 12 सप्टेंबर च्या कोणत्याही इवेंट ची घोषणा करण्यात आली नाही. तसेच रिपोर्ट मध्ये पुढे असे सांगण्यात आले आहे की हे नवीन iPhones 21 सप्टेंबर पासून सेल साठी येतील.
लीक आणि रुमर्स
काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट वर विश्वास ठेवल्यास, Apple ची यावर्षी ची सर्वात मोठी म्हणजे आयफोन एक्स प्लस च्या मागे एक ट्रिपल-कॅमेरा सेटअप देणे, जो Huawei P20 Pro सारखा असेल.
आईफोन एक्स प्लस च्या स्कीमॅटिक्स पासून सुरू करूया. यात एक लांबट ट्रिपल रीयर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. जो P20 Pro सारखा असेल पण सर्व सेंसर एकाच मॉड्यूल ठेवण्यात येतील. असे वाटतेच आहे की Apple ला अजूनही पूर्णपणे बेजल-कम होण्यासाठी मार्ग मिळाला नाही. P20 प्रो वर, 8 एमपी टेलीफोटो लेंस आणि 40 एमपी आरजीबी सेंसर एकाच जागी देण्यात आले आहेत, तर 20 एमपी मोनोक्रोम लेंस वेगळी देण्यात आली आहे आणि ती अशी वाटते जणू काय ती मागील पॅनल मध्ये एम्बेडेड आहे. Apple कदाचित तिन्ही लेन्स एकत्र असतील त्यातील एक मोनोक्रोम सेंसर असू शकतो जो चांगले फोटो घेण्यासाठी इतर दोन्ही सेंसर कडून डेटा घेईल.
अतिरिक्त फीचर्स
आयफोन मधील एका अतिरिक्त सेंसर मुळे कमी प्रकाशात पण चांगली फोटोग्राफी करता येईल कारण आयफोन कमी प्रकाशातील फोटोग्राफी मध्ये खुप मागे आहे. या डिवाइस बद्दल बोलायचे तर या बद्दल अनेकदा माहिती समोर आली आहे. नवीन रिपोर्ट पण मागच्या ब्लूमबर्ग रिपोर्ट शी मिळताजुळता आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की Apple आयफोन साठी मागच्या बाजूला असलेल्या 3D सेंसर वर काम करत आहे जो एआर चा वापर चांगला करू शकेल. असे सांगण्यात आले होते की Apple 'टाइम-ऑफ-फ्लाइट' पद्धत वापरण्याचा विचार करत आहे जी लेजर च्या आसपास असलेल्या वस्तूंवर प्रकाश परावर्तित होण्यासाठी लागणार्या वेळ मोजून 3D मॉडेल बनवू शकते. तुम्हाला तर माहितीच आहे की आयफोन X वरील ट्रूडेप सेंसर आॅथेन्टीकेशन आणि एनिमोजिस साठी 3D मॉडेल बनवण्यासाठी यूजर्स च्या चेहर्यावर 30,000 लेजर डॉट्स कसे प्रोजेक्ट करतो ते.
लू यांचा अनुमान आहे की आयफोन वर तिसरी लेंस अतिरिक्त झूम क्षमता देण्यासाठी जास्त फोकल लांबी सह येईल. आधीपासून फोकस लेंस आयफोन 7 प्लस, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X मॉडेल मध्ये आहे पण आधीच्या 2x झूम पेक्षा पहिल्यांदाच आयफोन मध्ये कमीत कमी 3X ऑप्टिकल झूम दिला जाऊ शकतो. 3x ऑप्टिकल झूम, डिजिटल झूम प्रमाणे फोटो ची गुणवत्ता कमी न करता, फोटो डिवाइस व्यूफाइंडर मध्ये तिप्पट मोठा करू शकतो.
यूंटा सिक्योरिटीज चे विश्लेषक जेफ पु ने मागील रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की पुढल्या वर्षी येणार्या आयफोन पैकी एकात 6P लेंस डिजाइन असेल आणि त्यातून 5X झूम मिळू शकतो. सेटअप मध्ये कमीत कमी एक 12MP लेंस पण असू शकते आणि रिपोर्ट नुसार तिसरी लेंस 3X ऑप्टिकल झूम deu शकते.