मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पलने आपले दोन नवीन स्मार्टफोन आयफोन 6S आणि 6S प्लसला भारतात लाँच केले आहे. गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासूनच अॅप्पल आयफोन 6S आणि आयफोन 6S प्लस खरेदीसाठी उपलब्ध केले आहेत.
ह्या नवीन स्मार्टफोनच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर ह्यांची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आयफोन 6S १६जीबी-६४,८३६ रुपये, आयफोन 6S ६४ जीबी-७४,११७ रुपये, आयफोन 6S १२८ जीबी- ८३,४०१ रुपये, तर आयफोन 6S प्लस १६ जीबी- ७४,११७ रुपये, आयफोन 6S प्लस ६४ जीबी-८३,४०१ रुपये, आयफोन 6S प्लस १२८जीबी-८८,४७८ रुपये.
जर ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, अॅप्पल आयफोन 6S आणि 6S प्लस आपल्या आधीच्या मॉडेलपेक्षा थोडा बारीक आणि जड आहे. त्यासोबत ह्यात अनेक नवीन वैशिष्ट्येसुद्धा आहेत. ह्यात फोर्स टच वैशिष्ट्य आहे. ह्यात तीन वेगवेगळ्या स्तरांवर(टच, प्रेस आणि खोलवर जाऊन दाबणे) टचच्या मध्ये अंतर केले जाऊ शकते. हे वैशिष्ट्य अॅप्पल स्मार्टवॉचमध्ये आधी दिल्या गेलेल्या वैशिष्ट्यांचे पुढील जनरेशन व्हर्जन आहे. ह्याने टचचा अनुभव चांगला होईल आणि प्रतिसाद वेळ कमी होईल, ज्याने ह्यातील अॅप्स अजून तेजीने कामे करतील.
तसेच आयफोन 6S आणि 6S प्लसमध्ये आयसाईट सेंसरसोबत 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फेसटाईम सेंसरसह ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.
आयफोन 6S चार रंगांत – सिल्व्हर, गोल्ड, स्पाइस ग्रे आणि रोज गोल्ड यात उपलब्ध होईल. त्याशिवाय कॅमे-यात लाईव्ह फोटो फिचरसुद्धा दिले गेले आहे. ह्याच्या माध्यमातून स्थिर फोटोजचा व्हिडियो किंवा जीआयएफ (फोटोंचा तो प्रकार ज्यात हालचाल नजर येते.) मध्ये बदलता येईल. त्याशिवाय, ४के व्हिडियो रेकॉर्डिंग वैशिष्ट्यसुद्धा आहे. अॅप्पलने आयफोनमध्ये A9 प्रोसेसरचा वापर केला आहे.
भारतात ह्या फोनच्या प्री-बुकिंगसोबत सर्व कॉमर्स वेबसाइट्स अनेक प्रकारचे डिस्काउंट देत आहे. Paytm अॅपवर ग्राहक निव्वळ २,००० रुपयांत फोन प्री ऑर्डर करु शकता, त्याचबरोबर शॉपक्लूजवर फक्त १,००० रुपयात ह्याला बुक केले जाऊ शकते. एयरटेलने तर आपल्या ५७ स्टोअरमध्ये हयाला लाँच करण्याची घोषणा केली आहे.