४ इंचाचा डिस्प्ले असलेला आयफोन SE अखेर लाँच

Updated on 22-Mar-2016
HIGHLIGHTS

अॅप्पलने आपला 4 इंचाचा आयफोन SE लाँच केला आहे. अॅप्पलने हा दोन प्रकारात लाँच केला आहे ह्याच्या 16GB व्हर्जनची किंमत 399 डॉलर आणि 64GB व्हर्जनची किंमत 499 डॉलर ठरविण्यात आली आहे.

अॅप्पलचा बहुप्रतिक्षित असा आयफोन SE अखेर लाँच झाला. सोमवारी झालेल्या “Let Us Loop You In” कार्यक्रमात हा 4 इंचाचा डिस्प्ले असलेला आयफोन SE लाँच झाला.

 

आयफोन SE च्या वैशिष्ट्ये आयफोन 6S शी बरीच मिळती जुळती आहे. ह्याच्या डिझाईन आणि फॉर्म फॅक्टरविषयी बोलायचे झाले तर, हा आयफोन 5S सारखाच आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की. आयफोन SE मध्ये जो प्रोसेसिंग पॉवर दिला आहे, तो एकदम आयफोन 6S सारखा आहे. त्याचबरोबर हा आयफोन SE, आयफोन 5S पेक्षा दुप्पट शक्तिशाली आहे. जसे की आपण ह्याआधीही ऐकले असेल की, आयफोन SE त्याच रंगात येईल जे आयफोन 6S चे होते.

अॅप्पलने हा दोन प्रकारात लाँच केला आहे ह्याच्या 16GB व्हर्जनची किंमत 399 डॉलर आणि 64GB व्हर्जनची किंमत 499 डॉलर ठरविण्यात आली आहे. हा नवीन आयफोन 31 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याला मे मध्ये १०० देशांमध्ये विकले जाईल. हा आयफोन SE ची भारतातील किंमत ३९,००० रुपये आहे.

ह्यात आपल्याला A9 प्रोसेसर आणि M9 मोशनचे को-प्रोसेसर मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 12MP चा isight (रियर) कॅमेरा 4K व्हिडियो सपोर्ट मिळत आहे, त्याशिवाय आयफोन SE मध्ये 1.2MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात अॅप्पल सपोर्टसह एक फिंगरप्रिंट सेसरसुद्धा मिळत आहे.

हेदेखील वाचा – ह्या अॅप्सच्या मदतीने तुमची होळी बनवा अजून खास

हेदेखील वाचा – उत्कृष्ट ऑप्टिकल झूम आणि कॅमेरा रिझोल्युशनसह येणारे अॅडव्हान्स कॅमेरे

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :