अॅप्पल लवकरच बाजारात आपला नवीन आयफोन सादर करणार आहे. तथापि, ह्या नवीन आयफोनच्या लाँचिंगच्या तारखेविषयी काही विशेष माहिती मिळालेली नाही. मात्र अशी माहिती मिळाली आहे की, अॅप्पल २१ मार्चला एक इव्हेंट करणार आहे आणि कंपनी ह्या इव्हेंटमध्ये आपला नवीन फोन लाँच करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अॅप्पलने स्वत: ह्याविषयी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅप्पल २१ मार्चला एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे आणि कंपनीने त्यासाठी निमंत्रण पाठवणेही सुरु केले आहे. आशा आहे की, कंपनी ह्या कार्यक्रमाता आपला 4 इंचाची स्क्रीन असलेला आयफोन Se आणि ९.७ इंचाचा आयपॅड प्रो लाँच करु शकते. आतापर्यंत कंपनीने निमंत्रणात ह्या डिवाइविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी ह्या कार्यक्रमात आपला नवीन आयफोन SE सादर करणार आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार, आयफोन Se मध्ये 1,642mAh ची बॅटरी असेल. हा फोन 16GB आणि 64GB स्टोरेज प्रकारात उपलब्ध होईल. आयफोन SE चे डिझाईन आयफोन 5S आणि आयफोन 6S शी मिळते-जुळते असू शकते. त्याशिवाय ह्या फोनमध्ये अॅप्पलच्या A9 प्रोसेसरसह M9 मोशन को-प्रोसेसरचा उपयोग होऊ शकतो. ह्यात 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा असू शकतो. ज्यात लाइव फोटो सेंसर उपलब्ध होऊ शकतो.
हेसुद्धा वाचा – ह्या ५ अॅप्सच्या माध्यमातून मिळेल ICC वर्ल्ड T20 इंडिया 2016 चे अपडेट्स
हेसुद्धा वाचा – ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला इनफोकस बिंगो 20 लाँच, किंमत ५,७४९ रुपये