मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पल लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन आपला नवीन स्मार्टफोन आयफोन ७ लाँच करु शकते. हा आयफोन २०१६ मध्ये लाँच केला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रिसर्च फर्म ट्रेंडफोर्सने अशी माहिती दिली आहे की, आयफोन ७ वॉटरप्रुफ असेल. त्याचबरोबर आयफोन 7 मध्ये 3GB रॅमसुद्धा असेल. तसेच ट्रेंडफोर्स असेही म्हणाले आहे की, अॅप्पल २०१६ मध्ये ४ इंचाची स्क्रीन असलेला आयफोन आणू शकतो.
त्याशिवाय त्यांनी असेही सांगितले आहे की, आयफोनच्या पुढील हँडसेटमध्ये 3GB रॅम, ५.५ इंचाची डिस्प्ले असू शकते. कंपनीने पुढील वर्षी ४ इंचाचा आयफोन लाँच करु शकतो आणि हा आयफोन 6C नावाने येऊ शकतो.
अॅप्पल आयफोन 6Cमध्ये 5S सारखे फीचर्स असण्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर ह्यात उत्कृष्ट फेसटाइम HD कॅमेरा, वायफाय आणि ब्लूटुथ असण्याचा दावा केला जात आहे.
KGI एनालिस्ट मिंग ची कुओने असा दावा केला आहे की, अॅप्पल 2016 मध्ये आयफोन 6C लाँच करु शकतो.