मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पलने काही दिवसांपूर्वी आपले दोन नवीन स्मार्टफोन्स आयफोन 6S आणि 6S प्लसला बाजारात लाँच केले. लाँचच्या वेळी आयफोन 6S ची किंमत ६२,००० पासून सुरु होत होती. पण आता आयफोन 6S च्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट केली आहे.
ह्या स्मार्टफोनला आता तुम्ही एका ऑनलाइन शॉपिंग स्टोरवर ४९,९९९ रुपयात घेऊ शकता. तथापि, अॅप्पल आयफोन 6S ची किंमत कमी का केली ह्याबाबत अजूनही कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
अॅमेझॉन इंडिया स्टोरवर अॅप्पल आयफोन 6S 16GB मॉडेल ४९,९९९ रुपयांत, ६४जीबी ६५,९९९ रुपयांत आणि १२८जीबी मेमरी असलेला व्हर्जन ७५,९९९ रुपयांत उपलब्ध होईल.
त्याचबरोबर अॅप्पल आयफोन 6S प्लसची किंमतसुद्धा कमी झाली आहे. अॅमेझॉन इंडिया स्टोअरवर अॅप्पल आयफोन 6S प्लस १६जीबी मॉडेल ६५,९९९ रुपयात, ६४जीबी ७५,९९९ रुपयात आणि १२८जीबी ८५,९९९ रुपयात उपलब्ध होईल. तर स्नॅपडीलवर अॅप्पल आयफोन 6S प्लस १६जीबी मॉडेल ६५,९९९ रुपये, ६४जीबी ७५,९९९ आणि १२८जीबी ८६,८३५ रुपयात उपलब्ध आहे.
त्याशिवाय फ्लिपकार्टवर अॅप्पल आयफोन 6S 16GB मॉडेल ५२,९९३ रुपयात, ६४जीबी ६४,९९९ आणि १२८जीबी ७५,९९९ रुपयात उपलब्ध आहे.
तर फ्लिपकार्टवर अॅप्पल आयफोन 6S प्लस १६जीबी मॉडेल ६५,९९९ रुपयात, ६४जीबी ७५,९९९ आणि १२८जीबी ८६,८३५ रुपयात उपलब्ध आहे.