अॅप्पलच्या दोन नवीन आयफोन्सवर मिळत आहे ३४,००० रुपयांचा सर्वात मोठा डिस्काउंट

Updated on 10-Nov-2015
HIGHLIGHTS

अॅप्पल पहिल्यांदा आपल्या आयफोन्सवर सर्वात मोठा डिस्काउंट देणार आहे. कंपनीने आपले दोन नवीन आयफोन्स 6S आणि 6S प्लसवर ३४ हजारांपर्यंतचा डिस्काउंट आणि एक्सचेंज देणार आहे.

अॅप्पल गेल्या काही काळापासून भारतातील स्मार्टफोनच्या बाजारात आपले पाय रोवण्याच्या विचारात आहे. ह्यासाठी कंपनीने आपल्या दोन नवीन आयफोन्सवर बायबँकचा सर्वात मोठा डिस्काउंट देण्याविषयी बातचीत करत आहे. त्याचबरोबर कंपनी आपल्याला एक्सचेंज ऑफर सुद्धा देत आहे. कंपनीने भारतीय बाजारात ह्या आयफोन्सला सर्वांच्या हातात पाहू इच्छिते आणि त्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

 

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कंपनी आपल्या दोन आयफोन्स 6S आणि 6S प्लसवर ३४,००० पर्यंत डिस्काउंट आणि एक्सचेंज देणार आहे. असेही सांगू शकतो की, कंपनी आणि त्यांचे रिटेलर्स आपल्या आयफोन्सलासुद्धा ह्या स्कीमअंतर्गत विकण्याची योजना बनवत आहे. ह्या दोन्ही आयफोन्स 6S आणि 6S प्लसला हल्लीच ६२ हजार आणि ९२ हजार किंमतीच्या आसपास लाँच केले होते. त्याचबरोबर अॅप्पल आतापर्यंत ह्याच्या प्री-बुकिंगच्या आकड्यांनासुद्धा ओलांडू शकली नाही. मागील वर्षी आलेल्या आयफोन्सवर ८५०० ते ९००० पर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

ह्या स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, अॅप्पल आयफोन 6S आणि 6S प्लस आपल्या आधीच्या मॉडेलपेक्षा थोडा बारीक आणि जड आहे. त्याचबरोबर ह्यात अनेक खास वैशिष्ट्य आहेत. ह्यात फोर्स टच फीचर आहे. हा तीन वेगवेगळ्या लेवल (टच,प्रेस आणि डीपर प्रेस) टचच्या मध्ये अंतर करु शकतो. हे वैशिष्ट्य अॅप्पल स्मार्ट वॉचमध्ये पहिले दिले गेलेल्या फीचरचे पुढील जनरेशन व्हर्जन आहे. ह्याने टच अनुभव चांगला होईल आणि प्रतिसाद वेळ कमी होईल, ज्याने ह्याचे अॅप्स अजून गतीने काम करतील.

त्याचबरोबर आयफोन 6S आणि 6S प्लसमध्ये आयसाइट सेंसरसह १२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फेसटाइम सेंसरसह ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. आयफोन 6S ४ रंगांत सिल्व्हर, गोल्ड, स्पाइस ग्रे आणि रोज गोल्डमध्ये उपलब्ध होईल. त्याशिवाय कॅमे-यामध्ये लाइव फोटो फीचरसुद्धा दिले गेले आहे. ज्याच्या माध्यमातून स्टील फोटोजला व्हिडिओ किंवा जीआयएफ(फोटोंचा तो प्रकार ज्यात हालचाली दिसतात) मध्ये बदलले जाईल. त्याशिवाय 4K व्हिडियो रेकॉर्डिंग फीचरसुद्धा दिले गेले आहे. अॅप्पलने आयफोनमध्ये A9 प्रोसेसरचा वापर केला आहे.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :