LG G5 : 4GB रॅमने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन लवरकच होणार भारतात लाँच
ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 4GB ची LPDDR4 रॅम दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 32GB ची अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी LG ने अलीकडेच MWC 2016 मध्ये आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन LG G5 लाँच केला. आता कंपनीने अशी माहिती दिली आहे की, पुढील तीन महिन्यात हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाईल. ह्या समार्टफोनमध्ये आतापर्यंतचे सर्वात उत्कृष्ट असे क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आले आहे.
ह्या स्मार्टफोनच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनला एका खास डिझाईनसह लाँच केले आहे. ह्या स्मार्टफोनला मेटल बॉडीसह स्लीक डिझाईनसह बाजारात आणले आहे.
त्याशिवाय ह्यात स्लाइड आउट रिमूव्हेबल बॅटरी दिली गेली आहे, ज्याने ह्या स्मार्टफोनच्या बॅटरीला एका स्लायडरप्रमाणे बाहेर काढू शकतो. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये १३५ डिग्री वाइड अँगल्स लेन्स दिले आहे, ज्याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट फोटो काढू शकता.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.3 इंचाची क्वाड-कोर HD IPS क्वांटम डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे पिक्सेल रिझोल्युशन 2560×1440/554ppi आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 4GB ची LPDDR4 रॅम दिली गेली आहे स्मार्टफोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो.
ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 16 मेगापिक्सेलचा रियर आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोसह बाजारात आणला आहे. ह्यात 2800mAh ची बॅटरी दिली गेली आहे. तसेच ह्यात LTE/3G/2G सपोर्टसुद्धा आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय 8/0.211/a/b/g/n/ac/USB टाइप-co (3.0 compatible) सह NFC, ब्लुटूथ ४.२ दिला गेला आहे.
हेदेखील वाचा – फ्रीडम 251: ह्या स्मार्टफोनसाठी रिंगिग बेल्स स्विकारणार कॅश ऑन डिलिवरी
हेदेखील वाचा – MWC 2016 मध्ये लाँच झाले अद्भभूत असे १० उत्कृष्ट स्मार्टफोन्स