अॅप्पलने आपला इव्हेंट २२ मार्चला ढकलला आहे. साउथ कोरियाची वेबसाइट UnderKG च्या रिपोर्टनुसार, ही माहिती देण्यात आली आहे. मागील रिपोर्टनुसार, अॅप्पल आपल्या ह्या इव्हेंटला 15 मार्चला करणार होती. जेथे अॅप्पल आपला 4 इंचाचा आयफोन 5Se आणि आयपॅड एयर 3 ला लाँच करणार होती. आता हा कार्यक्रम 22 मार्चला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आणि येथेच ह्या आयफोन आणि आयपॅड ला लाँच केले जाईल.
तथापि, 9to5Mac चा रिपोर्ट सांगतो की, अॅप्पल आता आपला आयपॅड एअर 3 लाँच करणार नाही, तथापि त्याजागी अॅप्पल आपला ९ इंचाचा आयपॅड प्रो लाँच करणार आहे. त्याच्यासोबच एक अॅप्पल पेनसुद्धा लाँच करेल. ह्या डिवाइससोबत एक वेगळा किबोर्ड येईल,ज्याला ह्याच्या सोबत जोडले जाऊ सकते. ह्याला एक स्मार्ट कनेक्टरसह जोडले जाईल. किंवा असे होऊ शकते की, ह्या इव्हेंटमध्ये आयपॅड एयर लाँच केले जाणार नाही.
काही महिन्यापूर्वी अॅप्पल आयपॅड एयर 3 चा फोटो लीक झाला होता. ह्या फोटोनुसार, नवीन आयपॅड एक क्वाड-स्पीकरसह येणार होता, ज्याला स्मार्ट कनेक्टरच्या माध्यमातून कनेक्ट केले जाऊ शकते. त्याशिवाय हा अजून ब-याच आकर्षक एक्सेसरीजसह येणार अल्याचे संकेत होते.
हेदेखील वाचा – MWC 2016 मध्ये लाँच झाले अद्भभूत असे १० उत्कृष्ट स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – फ्रीडम 251: ह्या स्मार्टफोनसाठी रिंगिग बेल्स स्विकारणार कॅश ऑन डिलिवरी