अॅप्पल आयफोन 5Se किंवा आयफोन SE विषयी एक नवीन अफवा समोर येत आहे. ह्या अफवांनुसार, ह्या फोटोमध्ये दिसत आहे, स्मार्टफोन लेटेस्ट आयफोन. ह्या फोटोला पाहिल्यावर कळेल की, ह्या बॉक्सच्या आत एक ४ इंचाचा डिवाइस आहे, जो 2.5D कर्व्ह्ड ग्लाससह येतो. ह्या आयफोनचे नाव आहे 5Se. एका नवीन लीकनुसरा, आता अॅप्पलच्या नवीन स्मार्टफोनचे नाव अॅप्पल आयफोन 5 नाही तर आयफोन SE असणार आहे. हा एक स्पेशल एडिशन असेल. तथापि, ह्या फोटोमध्ये कोणता आयफोन आहे. हे मात्र तुम्हाला नंतर कळेल.
ह्या फोटोमध्ये दिसत आहे की, ह्याचे पॉवर बटन उजव्या बाजूला दिले आहे. हे आयफोन 5s पेक्षा एकदम विरुद्ध असल्याचे सांगितले जाऊ शकते. त्याशिवाय नवीन आयफोन 5Se अॅप्पलच्या लेटेस्ट जेन A9 प्रोसेसरने सुसज्ज असेल. ह्यात 1GB ची रॅम असण्याची शक्यता आहे. ह्यात 1650mAh क्षमतेची बॅटरी असू शकते. ह्या फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा iSight कॅमेरा असू शकतो, जो लाइव फोटो सपोर्टसुद्धा करु शकतो. त्याशिवाय ह्यात 3D टचला सामील केले जाणार नाही.
काही दिवसांपूर्वी अशा बातम्या ऐकायला मिळत होत्या आणि अजून ह्या विषयी चर्चा होतेय की, अॅप्पल २२ मार्चला आपला एक कार्यक्रम करणार आहे. जेथे तो आपले डिवाइस लाँच करेल. आता तुम्हाला ह्या नवीन ४ इंचाच्या आयफोनसाठी २२ मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल, तेव्हाच तुम्हाला ह्याबाबत सविस्तर माहिती मिळेल.
हेदेखील वाचा – ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर मिळतेय मोटोरोलाच्या फोनवर उत्कृष्ट सूट
हेदेखील वाचा – 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असलेल्या दोन उत्कृष्ट स्मार्टफोनची तुलना