अॅप्पल आयफोन 5S मिळणार केवळ १२,००० रुपयात

Updated on 07-Mar-2016
HIGHLIGHTS

अमेरिकी टेक कंपनी अॅप्पल आयफोन 5S च्या किंमतीत ५० टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे. जर असे झाले तर भारतात ग्राहकांना आयफोन 5S केवळ १२,००० रुपयांत मिळेल.

मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पल लवकरच आपल्या आयफोन 5S च्या किंमतीत घट करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी असे अशासाठी करत आहे की, कंपनी लवकरच बाजारात आपला नवीन 4 इंचाचा डिस्प्ले असलेला आयफोन SE लाँच करणार आहे आणि ह्याला लाँच करण्याआधी कंपनी आयफोन 5S चा स्टॉक संपवू इच्छितेय.

 

अमेरिकी टेक कंपनी अॅप्पल आयफोन 5S च्या किंमतीत ५० टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे. जर असे झाले तर भारतात ग्राहकांना आयफोन 5S केवळ १२,००० रुपयांत मिळेल. ह्याआधी हल्लीच आयफोन 5S च्या किंमतीत घट करण्यात आली होती. हे फोन भारतीय बाजारात आता २२ ते २५ हजारांच्या किंमतीत मिळतील.

हेदेखील वाचा – अॅप्पलचा आयफोन 5Se स्मार्टफोन एक अनबॉक्स्ड फोटो झाला लीक

हेदेखील वाचा – 12,000 च्या किंमतीत उत्कृष्ट बॅटरी लाइफसह येणारे दोन उत्कृष्ट स्मार्टफोन

मिडियाच्या अहवालानुसार, आयफोन SE ची लाँचिंगनंतर अॅप्पल आयफोन 5S च्या किंमतीत ५० टक्क्यांची घट होईल. आता पाहायचे हे आहे की, कंपनी भारतात ही सूट देणार की नाही. भारतात वाढत्या स्मार्टफोन बाजार असूनसुद्धा मागील काही दिवसांत अॅप्पल आयफोनची विक्री कमी झाली आहे.

हेदेखील वाचा – उद्या भारतात लाँच होणार हे आकर्षक स्मार्टफोन्स

हेदेखील वाचा – व्हॉट्सअपने पाठ फिरवल्यानंतर आता ब्लॅकबेरी BBM ला आणणार नव्या रुपात

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :