मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पलने भारतात आपल्या आयफोन 5C ची किंमत कमी केली आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या किंमतीत मागील तीन महिन्यात सलग तिस-यांदा घट केली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात आयफोन 5S ची किंमत सर्वात कमी आहे.
सप्टेंबरमध्ये हा स्मार्टफोन ४४,५०० रुपयात विकला जात होता. आता कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत कमी करुन २४,९९९ रुपये केली आहे.
लवकरच कंपनी आपले दुसरे स्मार्टफोन्स आयफोन 6 आणि आयफोन 6S ची सुद्धा किंमत कमी करेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
अॅप्पल आयफोन 5S च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, हा A7 चिपसेटने सुसज्ज आहे. ह्यात को-प्रोसेसरसुद्धा आहे.
त्याचबरोबर हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सेलच्या रियर कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्यात ड्यूल LED फ्लॅशलाइट दिली गेली आहे. हा रियर कॅमेरा 720p HD मूव्ही रेकॉर्ड करु शकतो.