Apple लव्हर्ससाठी खुशखबर! लेटेस्ट iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max लाँच, वाचा सर्व तपशील

Updated on 10-Sep-2024
HIGHLIGHTS

Apple Glowtime Event 2024 मध्ये आपली बहुप्रतीक्षित लेटेस्ट iPhone 16 सिरीज लाँच केली.

लेटेस्ट स्मार्टफोन सिरीजच्या iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max फोनबद्दल सविस्तर माहिती

Apple Intelligence द्वारे, तुम्ही Siri द्वारे तुमच्या iPhone मधील महत्वाची माहिती आणि तपशील शोधण्यात सक्षम असाल.

Apple ने आज Apple Glowtime Event 2024 मध्ये आपली बहुप्रतीक्षित लेटेस्ट iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. Apple या नवीनतम स्मार्टफोन्सची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. या इव्हेंटदरम्यान कंपनीने केवळ लेटेस्ट स्मार्टफोनच नाही तर, कंपनीने लेटेस्ट Apple Watch Ultra 2 redesign आणि Watch 10 सिरीज देखील दाखल केली आहे. त्याबरोबरच, कंपनीने ऑडिओ व्हीडिओ उत्पादन विभागात लेटेस्ट Apple Airpods देखील लाँच केले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला लेटेस्ट स्मार्टफोन सिरीजच्या iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max फोनबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. हे दोन्ही स्मार्टफोन अगदी जबरदस्त कॅमेरा अपग्रेडसह सादर करण्यात आले आहेत.

iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max किंमत

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत $999 आहे. तर, प्रो मॅक्सची किंमत $1199 आहे. त्यांची ऑर्डर 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

iPhone 16 Pro चे तपशील

iPhone 16 Pro मध्ये 6.3-इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश दर 60Hz आहे. याशिवाय, हा iPhone A18 Pro चिपसेटने सुसज्ज आहे. कोणत्याही फोनमध्ये हा सर्वात वेगवान CPU असेल, असा कंपनीचा दावा आहे. यात अनेक प्रगत प्रो-मोशन फीचर्स आहेत, जी केवळ प्रो मॉडेल्सपुरती मर्यादित आहेत. Apple Intelligence द्वारे, तुम्ही Siri द्वारे तुमच्या iPhone मधील महत्वाची माहिती आणि तपशील शोधण्यात सक्षम असणार आहात. ऑडिओसाठी यात चार माइक दिलेले आहेत.

याव्यतिरिक्त, स्थानिक ऑडिओ फीचर्ससाठी समर्थन देखील उपलब्ध आहे. व्हॉईस मेमोसाठी अनेक नवीन फीचर्स देखील जाहीर करण्यात आली आहेत, जी वर्षाच्या अखेरीस आणली जाऊ शकतात. प्रो फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 48MP प्राथमिक कॅमेरा आहे. त्याच वेळी, 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा उपलब्ध आहे. या सेटअपमध्ये 12MP टेलिफोटो सेन्सर आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5x ऑप्टिकल झूम मिळेल.

कॅमेरा कंट्रोलद्वारे, तुम्ही iPhone 16 Pro मॉडेल्सच्या कॅमेरामध्ये सहज प्रवेश करू शकाल. व्हिडीओसाठी iPhone 16 Pro मॉडेल्समध्येही अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. सिनेमॅटिक स्लो मोशन फिचर देखील उपलब्ध आहे.

iPhone 16 Pro Max चे तपशील

iPhone 16 Pro Max मध्ये 6.9 इंचाचा OLED डिस्प्ले आहे. याशिवाय, हे मॉडेल A18 Pro चिपने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये प्रो मॅक्स मॉडेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. यात OIS सपोर्टसह 48MP प्राथमिक कॅमेरा आणि 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. याशिवाय, या सेटअपमध्ये 12MP पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर आहे, जो 5X ऑप्टिकल झूमसह येतो. पॉवरसाठी या फोनमध्ये 4,676mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :