digit zero1 awards

Black Friday Sale मध्ये ऑफर्सचा वर्षाव सुरु! iPhone च्या ‘या’ मॉडेल्सवर भरघोस डिस्काउंट उपलब्ध, Limited Time डील 

Black Friday Sale मध्ये ऑफर्सचा वर्षाव सुरु! iPhone च्या ‘या’ मॉडेल्सवर भरघोस डिस्काउंट उपलब्ध, Limited Time डील 
HIGHLIGHTS

Black Friday Sale सुरू झाल्यामुळे सर्वत्र उत्तम टेक डीलची जत्रा

iPhone 15 वर तब्बल 8000 रुपयांची बचत करता येईल.

Apple Watch Series 9 देखील 2500 रुपयांच्या त्वरित सवलतीत उपलब्ध

सध्या सर्वत्र Black Friday Sale चा माहोल सुरु झाला आहे. Black Friday Sale सुरू झाल्यामुळे सर्वत्र उत्तम टेक डीलची जत्रा भरली आहे. यामध्ये iPhone लव्हर्ससाठी मोठी बचत करण्याची संधी आहे. आता, Apple आपल्या नवीनतम iPhone 15 आणि अगदी गेल्या वर्षीच्या iPhone 14 मॉडेल्सवर भारतात मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. चला तर मग जाणून घेऊयात iPhones वरील अप्रतिम डील्स.

हे सुद्धा वाचा: Vivo V29 लाँच झाल्यानंतर लगेच बंपर Discount सह उपलब्ध, 50MP कॅमेरासह मिळतील अनेक अप्रतिम बेनिफिट्स। Tech News

iPhone 15 Pro Max

Black Friday Sale

iPhone 15 वरील उपलब्ध डिस्काउंट

Apple चा iPhone 15 स्मार्टफोन iNvent वर मोठ्या डिस्काउंट ऑफरमध्ये उपलब्ध आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, iNvent हे भारतात अधिकृत Apple पुनर्विक्रेता (रिसेलर) आहे. यामध्ये हे उपकरण 3000 रुपयांच्या त्वरित सवलतीसह उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त, ग्राहकांना 5000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळू शकतो, ज्यामुळे एकूणच डिव्हाइसची प्रभावी किंमत 8000 रुपयांनी कमी होणार आहे. वरील सर्व ऑफर्ससह, तुम्हाला फक्त 71,900 रुपयांमध्ये iPhone 15 खरेदी करता येईल.

iPhone 14 वरील उपलब्ध डिस्काउंट

Apple च्या iPhone 14 ची किंमत देखील ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान लक्षणीयरीत्या कमी करण्यात आली आहे. लक्षात घ्या की, iNvent या फोनवर 5000 रुपयांची थेट सूट आणि 4000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक देत आहे. यासह iPhone 14 वर एकूण 9000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

iPhone 14 Special Offer

म्हणजेच तुम्हाला iPhone 14 चे 128GB मॉडेल 60,900 रुपयांना मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की हा डिवाइस 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये देखील येतो.

वरील दोन्ही iPhone मॉडेल्सशिवाय, Apple Watch Series 9 देखील विक्री किंमतीत सूचीबद्ध करण्यात आले आहे. हे 2500 रुपयांच्या त्वरित सवलतीत उपलब्ध आहे. या सवलतीच्या GPS मॉडेलसाठी त्याची किंमत 41,900 रुपयांवरून 39,400 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo