जर तुम्ही iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमध्ये सध्या मोठ्या डिस्काउंट ऑफर देत आहे. ज्यामध्ये iPhone चाही समावेश करण्यात आला आहे. जर तुम्हाला या डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर ही ऑफर फक्त मर्यादित काळासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला या ऑफरबद्दल सविस्तर सांगणार आहोत, जेणेकरून या फोनवर तुमचे हजारो रुपये वाचतील.
हे सुद्धा वाचा : चॅट करणे होईल मजेशीर! WhatsApp वर 21 इमोजी लाँच, आता यूजर्स 'या' समस्येने हैराण होणार नाही…
फ्लिपकार्टवर iPhone 14 च्या खरेदीवर मोठी बचत केली जाऊ शकते. iPhone 14 च्या खरेदीवर, तुम्हाला Flipkart वर 79,900 रुपये द्यावे लागतील, परंतु 16% ची त्वरित सूट दिली जात आहे. त्यानंतर फोनची किंमत 66,999 रुपये होईल. जर तुम्हाला ही रक्कम जास्त वाटत असेल, तर तुमच्यासाठी आणखी एक भारी ऑफर आहे.
Apple iPhone 14 च्या खरेदीवर तुम्हाला Flipkart कडून 16% ची सूट तर दिली जात आहे. परंतु, यावर कंपनी आपल्या ग्राहकांना खूप मोठा एक्सचेंज बोनस देखील ऑफर करत आहे. हा एक्सचेंज बोनस पूर्ण ₹ 20,000 चा आहे.
तुमच्याकडे जुना स्मार्टफोन एक्सचेंज करण्यासाठी चांगल्या स्थितीत असल्यास, तुम्ही या एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. तुमचा स्मार्टफोन उत्तम स्थितीत असल्यास एक्सचेंज करून तुम्हाला Apple iPhone 14 चा 128GB व्हेरिएंट फक्त ₹ 46999 मध्ये खरेदी करता येईल. या एक्सचेंज ऑफरसह हा फोन तुमच्या बजेटमध्ये येऊ शकतो. खरेदी करण्यासाठी तुम्ही साईटला भेट देऊ शकता.