अखेर प्रतीक्षा संपली ! Apple iPhone 14 सीरीजची जबरदस्त एंट्री, शानदार फीचर्ससह कंपनीचे नवे फोन लाँच

Updated on 08-Sep-2022
HIGHLIGHTS

Apple iPhone 14 सीरीज लाँच

सिरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल्सचा समावेश

iPhone 14 ची प्रारंभिक किंमत सुमारे 63,640 रुपये

कॅलिफोर्नियाची टेक कंपनी Apple ने आपली नवीनतम iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल्सचा समावेश आहे.  iPhone प्रेमी या लॉन्चची बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. या वर्षी पहिल्यांदाच Apple ने iPhone मध्ये अनेक उत्तमोत्तम फीचर्स समाविष्ट केले आहेत. विशेषतः प्रो मॉडेल्समध्ये बरेच बदल झाले आहेत आणि त्याचे हार्डवेअर देखील सुधारले गेले आहे.

हे सुद्धा वाचा : 6th ऍनिव्हर्सरीवर Jio ची धमाकेदार ऑफर, 75GB डेटा मोफत, खरेदीवर देखील मिळेल बंपर सूट

यावेळी सर्वात मोठा बदल डिव्‍हाइसच्‍या डिझाईन आणि कॅमेरा फिचर्समध्‍ये दिसला आहे आणि प्रो मॉडेल स्‍पेसिफिकेशनच्‍या दृष्‍टीने अधिक चांगले आहेत. दरम्यान, स्टॅंडर्ड आणि प्लस मॉडेल्समध्ये देखील अपग्रेड केले गेले आहेत. मात्र, या वर्षी Apple ने मिनी मॉडेल लॉन्च केलेले नाही. नवीन मॉडेल्समध्ये, कंपनीने सिक्योरिटी फिचर  म्हणून क्रॅश-डिटेक्शन आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणली आहे.

iPhone 14

Apple iPhone 14 ला पूर्वीप्रमाणेच नॉच मिळत राहिल आणि iPhone 13 प्रमाणे डिझाइन देण्यात आले आहे. त्याच्या डिस्प्ले 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. ज्यामध्ये सिरॅमिक शील्ड प्रोटेक्शन आहे आणि iOS 16 अपडेटसह नवीन फीचर्स वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असतील. नवीन डिव्हाइसमध्ये A15 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे, जो वापरकर्त्यांना दमदार परफॉर्मन्स देईल.

 फोनच्या मागील पॅनल वर दोन कॅमेरा लेन्स देण्यात आले आहेत. यात उत्तम 12MP कॅमेरा सेन्सर आहे आणि त्याची लो-लाईट परफॉर्मन्स 49 टक्क्यांनी सुधारली आहे. दुसऱ्या अल्ट्रा-वाइड सेन्सरने वाइड शॉट्स घेता येतात. iPhone 14 च्या फ्रंट पॅनलमध्ये ऑटोफोकससह 12MP TrueDepth कॅमेरा आहे.

iPhone 14 Plus

iPhone 14 Plus चा डिस्प्ले आकार 6.7 इंच लांबीचा आहे आणि तो सिरेमिक शील्ड प्रोटेक्शनसह सुपर रेटिना XDR डिस्प्ले देखील आहे. त्याची उर्वरित फीचर्स iPhone 14 सारखीच आहेत आणि दोघांमध्ये फक्त निवडक फरक आहेत. सर्व नवीन iPhone मॉडेल 5G कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येतात आणि वापरकर्त्यांना ई-सिमचा सोपा पर्याय देतात. त्याबरोबरच, फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टम देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये 12MP मेन सेन्सर व्यतिरिक्त दुसरा अल्ट्रा-वाइड लेन्स समाविष्ट आहे. 

iPhone 14 Pro

नवीन प्रो मॉडेल्समध्ये, ऍपलने नॉचच्या जागा पील-शेप कटआउट दिला आहे आणि या स्पेसला 'डायनॅमिक आयलंड' म्हटले आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने, कटआउटवर नोटिफिकेशन्स आणि कंट्रोल्स खास दाखवले  जातील. आयफोन 14 मध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले सपोर्टसह 6.1-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. नवीन फोनमध्ये Apple A16 Bionic चिपसेट देण्यात आला आहे, जो कोणत्याही स्मार्टफोनमध्ये आढळणारा सर्वात वेगवान प्रोसेसर असल्याचे म्हटले जात आहे.

iPhone 14 Pro मध्ये तीन सेन्सर असलेली कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे. यात क्वाड पिक्सेल सेन्सरसह 48MP कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. कंपनी यूजर्सना ProRAW मोडमध्ये फोटोग्राफीचा पर्याय देत आहे, जो 48MP मध्ये कॅप्चर केला जाऊ शकतो. यामध्ये वापरकर्त्यांना उत्तम झूमचा पर्यायही मिळेल. ऍक्शन व्हिडिओ वैशिष्ट्यासह, युजर्स स्टेबल 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात.

iPhone 14 Pro Max

iPhone 14 Pro Max मध्ये 2000nits च्या पीक आउटडोअर ब्राइटनेससह 6.7-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. ऑलवेज ऑन डिस्प्ले (AOD) सह, वापरकर्ते आता डिव्हाइस अनलॉक न करता टाइम आणि इतर महत्त्वाची इन्फो. पाहू शकतील. हा डिवाइस Apple A16 चिपसेट सह आला आहे, ज्यासोबत कॅमेरा परफॉर्मन्स आणि पॉवर बॅकअप मिळण्याचा दावा केला जातो. 

कंपनीचा दावा आहे की, नवीन 48MP ट्रिपल कॅमेर्‍यामुळे सामान्य वापरकर्त्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकजण हाय-कॉलिटी फोटोग्राफी करेल. वापरकर्त्यांना नवीन 2X टेलिफोटो पर्याय देखील देण्यात आला आहे. अल्ट्रा-वाइड लेन्सने उत्तम मॅक्रो फोटोग्राफी करता येते आणि कंपनीने फ्लॅश हार्डवेअरमध्येही सुधारणा केल्या आहेत. कंपनीने युजर्सना सिनेमॅटिक व्हिडिओग्राफीचा पर्याय देखील दिला आहे.

किंमत :

iPhone 14 ची प्रारंभिक किंमत $799 म्हणजेच सुमारे 63,640 रुपये आहे आणि iPhone 14 Plus ची प्रारंभिक किंमत $899 म्हणजेच सुमारे 71,600 रुपये ठेवण्यात आली आहे. या उपकरणांच्या प्री-ऑर्डर 9 ऑक्टोबरपासून घेतल्या जातील आणि लवकरच जागतिक स्तरावर पाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील.

त्याचप्रमाणे iPhone 14 Pro ची प्रारंभिक किंमत $ 999 म्हणजेच सुमारे 79,570 रुपये आणि iPhone 14 Pro Max ची प्रारंभिक किंमत $ 1,099 म्हणजेच सुमारे 87,540 रुपये ठेवण्यात आली आहे. या उपकरणांसाठी प्री-ऑर्डर देखील 9 सप्टेंबरपासून सुरू होतील आणि 16 सप्टेंबरपासून चार कलर ऑप्शनमध्ये फोन बाजारात येतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :