iPhone 14 वर अप्रतिम ऑफर, संपूर्ण 43,151 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करा

iPhone 14 वर अप्रतिम ऑफर, संपूर्ण 43,151 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करा
HIGHLIGHTS

iPhone 14 केवळ 36,749 रुपयांना मिळेल.

फ्लिपकार्टवर 43,151 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध

EMI व्यवहारांवर 4000 रुपयांची सूट

iPhone लव्हर्ससाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. लेटेस्ट iPhone म्हणजेच iPhone 14 सध्या प्रचंड सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही सवलत तुम्हाला इ- कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर मिळतेय. Apple iPhone 14 सध्या Flipkart वर अतिशय खास किंमतीत उपलब्ध आहे. तुम्ही iPhone 14 फक्त 36,749 रुपयांना खरेदी करू शकता. कसे ते बघा – 

iPhone 14 वरील ऑफर्स 

हा डिव्हाइस फ्लिपकार्टवर 69,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. याशिवाय HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड EMI व्यवहारांवर 4000 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट एक्सचेंज ऑफरमध्ये डिव्हाइस खरेदीवर 29,250 रुपयांची सूट उपलब्ध आहे. याचा अर्थ ऑफरनंतर तुम्हाला iPhone 14 केवळ 36,749 रुपयांना मिळेल. म्हणजेच Apple iPhone 14 सध्या फ्लिपकार्टवर 43,151 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. 

त्याबरोबरच, Flipkart ऍक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक मिळणार आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्टला हेत देऊ शकता. 

iPhone 14

iPhone 14 ही कंपनीची लेटेस्ट सिरीज आहे. iPhone 14 सिरीज मागील वर्षी म्हणजेच सप्टेंबर 2022 मध्ये लाँच करण्यात आली होती. Apple iPhone 14 ला 6.1-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळत आहे. डिव्हाइसला 12MP सेल्फी कॅमेरा मिळत आहे. फोनच्या मागील बाजूस 12MP डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo