iPhone 14 आणि Watch 8 ची आज पहिली सेल, जाणून घ्या डिस्काउंट आणि ऑफर्स

Updated on 16-Sep-2022
HIGHLIGHTS

iPhone 14 आणि Watch 8 आज विक्रीसाठी उपलब्ध होणार

ही सर्व प्रोडक्ट ऍप्पल इंडिया स्टोअरमधून विक्रीसाठी उपलब्ध असतील.

तुम्ही EMI तसेच एक्सचेंज ऑफरवर सुद्धा फोन खरेदी करू शकता

Apple ने अलीकडेच जागतिक स्तरावर आपली बहुप्रतिक्षित iPhone 14 सिरीज लाँच केली. ग्राहक या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी iPhone 14 आणि iPhone Pro भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध होतील. डिव्हाइसचे प्री-बुकिंग आधीच सुरू झाले आहे. नवीन iPhone 14 सिरीजसोबत Apple Watch Series 8 आणि Apple Watch SE देखील पहिल्यांदाच विक्रीसाठी जातील. ही सर्व प्रोडक्ट ऍप्पल इंडिया स्टोअरमधून विक्रीसाठी उपलब्ध असतील.

हे सुद्धा वाचा : AIRTELचा तगडा प्लॅन 500 रुपयांपेक्षा कमी! Amazon Prime, Disney+ Hotstar आणि बरेच काही मोफत 

'ही' सूट iPhone 14 सीरीज आणि Apple Watch वर उपलब्ध

Apple Store वरून iPhone 14 सीरीजचा कोणताही फोन खरेदी करण्यावर ग्राहकांना बँक आणि एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहेत. बँक ऑफर HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर आहे. ज्या अंतर्गत 6,000 रुपयांपर्यंत झटपट सूट दिली जात आहे. मात्र, ही बँक कार्ड ऑफर फक्त त्या उपकरणांवर लागू आहे, ज्यांची किंमत 54,900 रुपयांपेक्षा जास्त आहे.

EMI वर फोन खरेदी करण्याचा पर्याय देखील आहे. तुम्ही 24 महिन्यांचा EMI सुरू करून आणि दरमहा 480 रुपये भरून फोन खरेदी करू शकता. दुसरीकडे, तुम्ही जुन्या फोनला फोन एक्सचेंज करून 46,120 रुपयांची सूट मिळवू शकता, ही सूट तुमच्या फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे.

यासोबतच ज्यांना iPhone वर अधिक सूट मिळवायची आहे, ते Amazon आणि Flipkart सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफर देखील पाहू शकतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :