अॅप्पल आयपॅड प्रो ११ नोव्हेंबरपासून होणार सेलसाठी उपलब्ध

अॅप्पल आयपॅड प्रो ११ नोव्हेंबरपासून होणार सेलसाठी उपलब्ध
HIGHLIGHTS

ह्यात अॅप्पल A9 चिपसेट दिला गेला आहे. त्याचबरोबर अॅप्पल आयपॅड प्रोमध्ये ८ मेगापिक्सेलचा आयसाइट कॅमेरासुद्धा दिला आहे. कंपनीच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम IOS 9 वर हा काम करेल. ज्याच्या माध्यमातून अॅडव्हान्स मल्टीटास्किंग वैशिष्ट्याचा आपण आनंद घेऊ शकता.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अॅप्पलने आपला नवीन आयपॅड प्रो-11  ११ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंपनीेने लाँच केलेल्या दिवशी अशी माहिती दिली की, अॅप्पल आयपॅड प्रो नोव्हेंबरपर्यंत सेलसाठी उपलब्ध होईल. सध्यातरी अॅप्पल आयपॅड प्रो यूएस आणि यूकेसारख्या देशात उपलब्ध झाले आहेत.

 

अॅप्पलने ३२जीबी आणि १२८ जीबी मेमरी संस्करणमध्ये ह्याला सादर केले आहे, ज्याची किंमत क्रमश: ७९९ अमेरिकी डॉलर आणि ९४९ अमेरिकी डॉलर आहे. १२८ जीबी मॉडल सेल्युलर पर्यायासह सुद्धा उपलब्ध आहे, ज्याची किंमत १,०७९ अमेरिकी डॉलर आहे.

आयपॅड प्रो नावाने प्रदर्शित केलेला हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपॅड आहे. ह्याच्या आधी अॅप्पल आयपॅडचे सुद्धा संस्करण ९.७ इंच आणि आयपॅड मिनी ७.९ इंचाची स्क्रीन उपलब्ध आहे. तर अॅप्पल आयपॅड प्रोमध्ये १२.९ इंचाची डिस्प्ले आहे.

अॅप्पल आयपॅड प्रोच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात अॅप्पल A9 चिपसेट दिला गेला आहे. त्याचबरोबर अॅप्पल आयपॅड प्रोमध्ये ८ मेगापिक्सेलचा आयसाइट कॅमेरासुद्धा दिला आहे. कंपनीच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम IOS 9 वर हा काम करेल. ज्याच्या माध्यमातून अॅडव्हान्स मल्टीटास्किंग वैशिष्ट्याचा आपण आनंद घेऊ शकता.

अॅप्पल प्रोसह कंपनीने अॅप्पल पॅसिल आणि आयपॅड प्रो कव्हर लाँच केला आहे. ह्याची किंमत ९९ अमेरिकी डॉलर आणि १६९ डॉलर आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo