मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अॅप्पल आज भारतात आपला नवीन डिवाइस आयपॅड प्रो लाँच करु शकते. भारतात लाँच होण्यासोबतच हा डिवाइस विक्रीसाठीही उपलब्ध होईल.
नवीन आयपॅड प्रोमध्ये आपल्याला अनेक फीचर्स पाहायला मिळतील. जसे की 3D टच डिस्प्ले, स्टायलस ज्याला अॅप्पल पेन्सिल असे नाव दिले गेले आहे आणि अॅप्पल निर्मित स्मार्ट की-बोर्डसुद्धा उपलब्ध होईल.
अॅप्पल आयपॅड प्रो वायफाय 32GB मॉडेलची किंमत ६७,९०० रुपये आहे आणि अॅप्पल आयपॅड प्रो वायफाय 128GB मेमरीच्या संस्करणसाठी ७९,९०० रुपये मोजावे लागतील.
अॅप्पल आयपॅड प्रो चे सेल्युलर मॉडेल केवळ 128GB च्या अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध आहे. सेल्यूलर ऑप्शन मॉडेलची किंमत भारतात ९१,९०० रुपये आहे.
अगर अॅप्पल आयपॅड प्रो च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात अॅप्पल ९ चिपसेट दिला गेला आहे. त्याचबरोबर अॅप्पल आयपॅड प्रोमध्ये 8 मेगापिक्सेलचा आयसाइट कॅमेरा दिला गेला आहे. हा कंपनीच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम IOS 9 वर काम करेल, ज्याच्या माध्यमातून एडव्हान्स मल्टीटास्किंग फीचर्सचा आनंद घेऊ शकता.