Apple लव्हर्सची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. Apple ने अखेर आपली सर्वात बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सिरीज iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. Apple चा वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट म्हणजेच Apple Glowtime Event 2024 सुरु झालेला आहे. या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाची Apple लव्हर्स आतुरतेने प्रतीक्षा करत होते. लेटेस्ट iPhone 16 सिरीज अंतर्गत कंपनीने iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max असे चार व्हेरिएंट सादर केले आहेत. यासह कंपनीने लेटेस्ट स्मार्टवॉच मॉडेल्स आणि लेटेस्ट इयरबड्स मॉडेल्स देखील लाँच केले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला iPhone 16 आणि iPhone 16 Plus स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
लेटेस्ट iPhone 16 ची किंमत $799 इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, iPhone 16 Plus ची किंमत $899 इतकी निश्चित करण्यात आली आहे.
iPhone 16 मध्ये 6.1 इंच लांबीचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन चांगल्या परफॉर्मन्ससाठी A18 बायोनिक चिपसह सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनमध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48MP प्राथमिक कॅमेरा आणि एक 12MP टेलिफोटो कॅमेरा असेल, जो 2x झूम क्षमतेसह येतो. हे दोन्ही सेन्सर व्हर्टिकली स्थित आहेत.
Apple ने आपल्या नवीन सिरीजमध्ये एक नवीन कॅमेरा कंट्रोल बटण दिले आहे, जे बॉटमला एका काठावर स्थित आहे. हे बटण अनेक कॅमेरा नियंत्रणे प्रदान करेल. या बटणाद्वारे, तुम्ही फोटो आणि व्हिडिओ क्लिक करू शकता तसेच झूम-इन आणि झूम-आउट करू शकता. तुम्हाला हे नवीन बटण iPhone 16 सीरीजच्या चारही उपकरणांमध्ये मिळेल. यासोबतच यात ॲक्शन बटण देखील आहे. Apple Intelligence फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे तुमचे अनेक काम सोपे करेल. याच्या मदतीने तुम्ही मजकूर लिहून स्वतःसाठी वैयक्तिक इमोजी तयार करू शकता. ॲपल इंटेलिजन्स आयफोनमधील फोटो देखील व्यवस्थापित करेल.
iPhone 16 Plus मध्ये 6.7-इंच लांबीचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 60Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हे मॉडेल A18 बायोनिक चिपने सुसज्ज आहे. स्टोरेज विभागामध्ये या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये प्लस मॉडेलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. यात OIS सपोर्टसह 48MP प्राथमिक कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर असेल. पॉवरसाठी, iPhone 16 Plus मध्ये 4,006mAh बॅटरी देण्यात आली आहे.