Apple Event Date: बहुप्रतीक्षित लाँच इव्हेंटची तारीख जाहीर, iPhone 15 लवकरच मार्केटमध्ये होणार दाखल
Apple इव्हेंट 12 सप्टेंबर रोजी कंपनीच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयात होणार आहे.
कंपनी या इव्हेंटमध्ये iPhone 15 सीरीज लाँच करेल, अशी अपेक्षा आहे.
iPhone 15 सिरीज USB-C चार्जिंग पोर्टसह येण्याची अपेक्षा आहे.
प्रसिद्ध आणि लोकप्रिय कंपनी Apple चा वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट ज्यामध्ये कंपनी आगामी iPhone सिरीज लाँच करणार आहे. त्या इव्हेंटची डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे. Apple इव्हेंट 12 सप्टेंबर रोजी कंपनीच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयात होणार आहे. तपशील स्पष्टपणे सूचित करतात की, कंपनी या इव्हेंटमध्ये iPhone 15 सीरीज लाँच करेल. Appleचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग) ग्रेग जोसविक यांनी X (ट्विटर) वर ट्विट करून या इव्हेंटची माहिती दिली आहे.
Wonder awaits. September 12. #AppleEvent pic.twitter.com/48gRXu3Ux4
— Greg Joswiak (@gregjoz) August 29, 2023
यासोबतच या कार्यक्रमाची मायक्रो साईट देखील कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह करण्यात आली आहे. असे सांगण्यात आले आहे की, हा कार्यक्रम 12 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाईल, जो भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होईल. इव्हेंट apple.com वर किंवा Apple TV ऍपवर पाहता येईल.
Apple इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट्स सादर होण्याची शक्यता
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, गेल्या काही वर्षांप्रमाणे यावेळीही Apple नवीन iPhone सीरिजमध्ये चार फोन सादर करणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, यावेळी कंपनी iPhone च्या नावात काही बदल करू शकते. यामध्ये सध्या प्रो मॅक्स नावाने येणारे iPhoneचे टॉप मॉडेल अल्ट्रा नावाने सादर केले जाण्याची शक्यता आहे. काही अहवालांवर विश्वास ठेवला तर, वीन आयफोनमध्ये सर्वात मोठा बदल चार्जरमध्ये पाहायला मिळणार आहे.
होय, iPhone 15 सिरीज USB-C चार्जिंग पोर्टसह येण्याची अपेक्षा आहे. हे नवीन युरोपियन युनियन कायद्यामुळे आहे, ज्यासाठी युरोपियन युनियनमध्ये विकले जाणारे सर्व मोबाइल फोन, टॅब्लेट आणि कॅमेरे वायर्ड चार्जिंगसाठी USB-C वापरणे आवश्यक/बंधनकारक आहे.
या कार्यक्रमात कंपनी नवीन Apple Watch मॉडेल्स देखील सादर करू शकते. यात हाय-एंड ऍपल वॉच अल्ट्राची अपडेटेड आवृत्ती देखील समाविष्ट असेल. Apple सहसा सप्टेंबरच्या इव्हेंटमध्ये आयफोनसाठी iOS ची नवीन आवृत्ती देखील जारी करतो. iOS 17 यावर्षी रिलीज होण्याची अपेक्षा आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Apple इव्हेंटची तारीख आणि वेळ व्यतिरिक्त, या इव्हेंटमध्ये काय लॉन्च केले जाईल याबद्दल कुठेही अशी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र 12 सप्टेंबर रोजी Apple इव्हेंटमध्ये आगामी iPhone 15 सिरीजचे अनावरण केले जाईल असे सर्व संकेत आहेत. कारण दरवर्षी नवीन आयफोन सिरीज सप्टेंबर महिन्यातच सादर केली जाते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile