digit zero1 awards

Apple Diwali Sale: iPhone 14 च्या खरेदीवर ग्राहकांना मिळेल Attractive गिफ्ट, निम्म्याहून कमी किमतीत मिळतील New Airpods  

Apple Diwali Sale: iPhone 14 च्या खरेदीवर ग्राहकांना मिळेल Attractive गिफ्ट, निम्म्याहून कमी किमतीत मिळतील New Airpods  
HIGHLIGHTS

Apple ने Diwali Sale अंतर्गत नवीन ऑफर जाहीर केल्या आहेत.

Apple चा हा सेल 14 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

iPhone 14 आणि iPhone 14 Plus खरेदी करणाऱ्या ग्राहकांना AirPods वर 50% सूट

सर्व स्मार्टफोन्स ब्रँड दिवाळी निमित्त आपले प्रोडक्ट्सवर भारी सवलती आणि ऑफर्स देत आहेत. यात सर्वात एक्सपेन्सिव्ह आणि लोकप्रय ब्रँड Apple कसा मागे राहील? होय, Apple ने देखील Diwali Sale अंतर्गत नवीन ऑफर जाहीर केल्या आहेत. Apple च्या दिवाळी सेलची शेवटची तारीख जाहीर झाली आहे. हा सेल 14 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कंपनीने 15 ऑक्टोबरलाच या सेलची घोषणा केली होती. सेल दरम्यान, वापरकर्त्यांना iPhones, iPads, Macs, AirPods आणि स्मार्ट घड्याळे यांसारख्या Apple उत्पादनांवर बंपर डील आणि डिस्काउंट ऑफर मिळत आहेत.

apple iphone 14

Apple Diwali Sale नवीनतम ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, Apple दिवाळी सेल 14 नोव्हेंबरपर्यंत लाइव्ह असेल. सेल संपण्यापूर्वी कंपनीने काही नवीन ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफर्स अंतर्गत, iPhone 14 आणि iPhone 14 Plus खरेदी करणाऱ्या ग्राहकांना AirPods वर मोठ्या सवलतीच्या ऑफर मिळतील.

कंपनीने घोषणा केली आहे की iPhone 14 आणि iPhone 14 Plus खरेदी करणाऱ्या ग्राहकांना AirPods वर 50% सूट मिळेल. एवढेच नाही तर, यासोबतच त्यांना Apple म्युझिकचे 6 महिन्यांचे सबस्क्रिप्शनही मोफत मिळणार आहे.

लक्षात घ्या की, ही ऑफर केवळ iPhone 14 आणि iPhone 14 Plus खरेदी केल्यावरच उपलब्ध होईल. ही ऑफर AirPods (3rd generation) with Lightning Charging Case, AirPods (3rd generation) with MagSafe Charging Case आणि AirPods Pro (2nd generation) वर उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक या ऑफरचा लाभ Apple ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन स्टोअरमधून घेऊ शकतात, ज्यामध्ये मुंबई Apple BKC आणि दिल्ली Apple साकेत स्टोअरचा समावेश आहे.

लेटेस्ट iPhone सिरीजवर डिस्काउंट

  • Apple दिवाळी सेलमध्ये ग्राहकांना HDFC कार्डद्वारे मोठ्या सवलतीच्या ऑफर मिळतील.
  • iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max च्या खरेदीवर 6000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे.
  • iPhone 15 आणि iPhone 15 Pro Plus वर 5000 रुपयांची डिस्काउंट ऑफर उपलब्ध असेल.
  • iPhone 13 वर 3000 रुपये आणि iPhone SE वर 2,000 रुपयांची सूट मिळेल.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo