फ्लिपकार्टवर Apple Days सेल सुरू झाला आहे. या सेल दरम्यान, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तुम्हाला iPhones वर सवलत, बँक ऑफर, नो-कॉस्ट स्कीम आणि निवडक iPhones वर बरेच काही देत आहे. हा सेल 16 नोव्हेंबरला सुरू झाला होता. हा सेल फ्लिपकार्टवर 20 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. Apple iPhones वर कोणते डिल्स आणि सूट उपलब्ध आहेत ते बघुयात…
हे सुद्धा वाचा : OTT Release : या आठवड्यात 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट आणि सिरीज OTT वर होतील रिलीज, बघा यादी
सर्व ऑफर्ससह, iPhone 12 Mini 64GB स्टोरेज म्हणजेच बेस मॉडेल 39,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात खरेदी करता येईल. A14 बायोनिक चिप प्रोसेसर या फोनमध्ये उपलब्ध आहे, 5.4-इंच सुपर रेटिना XDR स्क्रीन, 5G कनेक्टिव्हिटी आणि GPS सपोर्ट स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या मागील बाजूस तुम्हाला ड्युअल-कॅमेरा सेट-अप मिळत आहे. ज्यामध्ये 12-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 12MP डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. आकर्षक सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 12MP सेल्फी कॅमेरासुद्धा मिळत आहे.
iPhone 11 64GB इंटर्नल स्टोरेज बेस मॉडेल 40,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात खरेदी केले जाऊ शकते. iPhone 11 64GB आणि 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. या फोनमध्ये A13 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे, याशिवाय iPhone 11 मध्ये 6.1-इंच लांबीची Liquid Retina HD स्क्रीन आहे.
iPhone 13 चे 128GB ऑन-बोर्ड स्टोरेज असलेले बेस मॉडेल 64,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात खरेदी केले जाऊ शकते. या फोनमध्ये A15 बायोनिक चिप प्रोसेसर आहे. यात 6.1-इंच लांबीची सुपर रेटिना XDR स्क्रीन आहे. फोनमध्ये ड्युअल-कॅमेरा सेट-अप आहे. ज्यामध्ये 12-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 12MP डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. फोनच्या पुढील बाजूस 12MP सेल्फी कॅमेरा देखील आहे.
iPhone 14 सध्या 74,990 रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. या फोनवर HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी कार्ड आणि EMI व्यवहारांवर विशेष सवलत दिली जात आहे. त्याबरोबरच, या फोनवर तुम्हाला 5000 रुपयांची झटपट सूट मिळत आहे. फोन A15 बायोनिक प्रोसेसरवर काम करतो, iPhone 14 मध्ये 6.1-इंच लांबीची सुपर रेटिना XDR स्क्रीन आहे.
iPhone 14 Plus 84,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ज्यामध्ये HDFC कार्ड्सवर 5,000 रुपयांची त्वरित सूट समाविष्ट आहे. फोन EMI वर देखील खरेदी करता येईल. फोनमध्ये 6.7-इंच सुपर रेटिना XDR स्क्रीन आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेट-अप आहे, ज्यामध्ये 12-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 12MP डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे. फोनच्या पुढील बाजूस 12MP सेल्फी कॅमेरा देखील आहे.