Apple Days Sale: ‘या’ iPhone मॉडेल्सवर मिळणार मोठ्या प्रमाणात Discount, मिळतायेत Best ऑफर्स

Updated on 19-Mar-2024
HIGHLIGHTS

विजय सेल्सद्वारे Apple Days Sale सुरु करण्यात आले आहे.

हा सेल 16 मार्चपासून सुरू झाला असून 24 मार्चपर्यंत चालणार आहे.

सेल अंतर्गत iPhone 15, iPhone 14, iPhone 13 वर उत्तम सवलती उपलब्ध आहेत.

iPhone लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही तुमचे विद्यमान स्मार्टफोन iPhone सह बदलण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. खरं तर, विजय सेल्सद्वारे Apple Days Sale सुरु करण्यात आले आहे. सेल अंतर्गत iPhone 15, iPhone 14, iPhone 13 आणि अनेक iPhones उत्तम सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा: अनेक AI फीचर्ससह Motorola चा आगामी स्मार्टफोन Flipkart वर सूचीबद्ध, ‘या’ दिवशी होणार भारतात लाँच। Tech News

Apple Days Sale

हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म दरवर्षी Apple Days Sale चे आयोजन करते. यावर्षी हा सेल 16 मार्चपासून सुरू झाला असून 24 मार्चपर्यंत चालणार आहे. यामध्ये iPhones, MacBooks, AirPods, iPads आणि Apple Watches सारख्या Apple च्या विविध उत्पादनांवर मोठ्या सवलती आणि इतर आकर्षक ऑफर देतात. त्यामुळे तुम्हीही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर iPhone 15, iPhone 14 आणि इतरांवर टॉप डिस्काउंट पहा.

Apple DaysSale: iPhone 15

Apple Days Sale मध्ये ‘या’ iPhones वर मिळणार भारी सूट

Apple Days सेल दरम्यान iPhone 15 ची किंमत खूपच कमी करण्यात आली आहे. मोठ्या सवलतीनंतर iPhone 15 Pro Max आता 1,49,240 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनची मूळ किंमत 1,59,900 रुपये आहे. तर iPhone 15 Pro ची किंमत 7% ने कमी झाली आहे आणि आता त्याची किंमत 1,25,900 रुपये झाली आहे. त्याबरोबरच, व्हॅनिला iPhone 15 आणि iPhone 15 Pro, जे साधारणपणे अनुक्रमे 79,900 आणि 89,900 रुपयांपासून सुरू होतात. सेलदरम्यान या दोन्ही फोन्सची किंमत अनुक्रमे 70,490 आणि 79,820 रुपये इतकी आहे.

iPhone 14 आणि 13 वरील ऑफर्स

तर, iPhone 14 ची किंमत 69,900 रुपयांवरून 61,160 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. याशिवाय, iPhone 14 Plus सध्या 70,490 रुपयांना उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, Apple चा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप iPhone म्हणजेच iPhone 13 आता आणखी स्वस्त झाला आहे. आता त्याची किंमत 59,900 रुपयांच्या मूळ किंमतीऐवजी 51,820 रुपयांपासून सुरू होते.

या व्यतिरिक्त, विजय सेल्सदरम्यान बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. ज्यात HDFC क्रेडिट/डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर सूट समाविष्ट आहे. तसेच, या सेलमध्ये ग्राहक Cashify च्या माध्यमातून त्यांचा जुना स्मार्टफोन नवीन iPhone सह एक्सचेंज करू शकतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :