प्रदीर्घ विरोधानंतर, Apple ने शेवटी USB-C चार्जिंग पोर्ट स्वीकारले आहे. Apple ने म्हटले आहे की, आगामी iPhones टाइप-C पोर्टसह येतील. अशा परिस्थितीत, iPhone 15 किंवा 16 सिरीज टाइप-C चार्जिंग पोर्टसह ऑफर केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
हे सुद्धा वाचा : Whatsapp Down: Whatsapp दोन तासांनंतर सुरू, यूजर्सना मेसेज पाठवण्यात येत होत्या अडचणी
Apple चे मार्केटिंग हेड Greg Joswiak यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Apple च्या iPhone साठी USB-C वर स्विच करण्याच्या योजनेबद्दल विचारले असता, Joswiak म्हणाले, "स्पष्टपणे, आम्हाला अनुसरण करावे लागेल, आमच्याकडे पर्याय नाही." आम्ही तुम्हाला सांगतो की, युरोपियन युनियनने 2024 पासून सर्व उपकरणांना टाइप-C पोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत.
जोसविक यांनी असेही म्हटले आहे की, केवळ युरोपियन युनियन देशांमध्येच नव्हे तर जगातील सर्व देशांमध्ये विकल्या जाणार्या आयफोनमध्ये यूएसबी-C पोर्ट असतील. अशा परीस्थितीत ऍप्पलला भारतीय बाजारपेठेसाठी मोठे बदल करावे लागणार नाहीत, कारण भारत सरकारही कॉमन चार्जरचा विचार करत आहे.
सध्या, Apple चे iPhones आणि iPads लाइटनिंग पोर्टसह येतात, जे Apple चे खास पोर्ट आहे. ऍप्पल शिवाय अन्य कोणतीही कंपनी या चार्जिंग पोर्टचा वापर करत नाही. नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 14 सिरीजसह Type-C पोर्ट अपेक्षित होते, पण तसे झाले नाही.