Apple ची मोठी घोषणा! iPhone 15 Series मध्ये मिळतील किमान पाच वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स। Tech News 

Apple ची मोठी घोषणा! iPhone 15 Series मध्ये मिळतील किमान पाच वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स। Tech News 
HIGHLIGHTS

Apple ने iOS 18 लाँच करण्यापूर्वी iPhone 15 संदर्भात एक विशेष घोषणा केली.

कंपनी iPhone 15 सिरीजमध्ये किमान पाच वर्षांसाठी सॉफ्टवेअर सपोर्ट देईल.

Google आणि Samsung आपल्या स्मार्टफोन्समध्ये सात वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स देतात.

Apple लव्हर्ससाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. Apple ने iOS 18 लाँच करण्यापूर्वी iPhone 15 संदर्भात एक विशेष घोषणा केली आहे. कंपनी आता आपल्या iPhone 15 सिरीजमध्ये किमान पाच वर्षांसाठी सॉफ्टवेअर सपोर्ट देईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Apple अजूनही आपल्या iPhones वर सुमारे 6 वर्षे सॉफ्टवेअर अपडेट पुरवते. मात्र, कंपनीने हे अजून नंबर्समध्ये वचन दिले नाही.

आम्ही तुम्हाला सांगतो की, एप्रिलच्या अखेरीस नवीन UK नियम लागू झाल्यामुळे Apple ला अधिकृतपणे iPhone साठी किमान समर्थन जाहीर करावे लागले. चला तर मग बघुयात सविस्तर माहिती-

Also Read: Realme Narzo N63 फोन भारतात 50MP कॅमेरासह लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News

Apple iPhone 15 साठी ‘इतक्या’ वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट

Apple सामान्यतः आपल्या iPhones ला दीर्घकाळ सॉफ्टवेअर अपडेट्स प्रदान करण्यासाठी ओळखले जातात. मात्र, कंपनीने ते किती वर्षांसाठी अपडेट्स प्रदान करतील, हे कधीही सांगितले नाही. अनेक अहवालांनुसार, आता यूकेच्या नियमांमुळे कंपनीला विशिष्ट वर्ष देण्यास सांगितले गेले आहे. त्यानंतर कंपनीने नवीनतम iPhone 15 सीरीजमध्ये किमान पाच वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट देण्याची घोषणा केली आहे.

Apple iPhone 15
Apple iPhone 15

मात्र, लक्षात घ्या की, उर्वरित iPhones साठी अद्याप कोणतेही अपडेट पुढे आलेले नाही. कंपनी हळूहळू हा अपडेट नियम इतर फोनसाठी देखील लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच आता iPhone वापरकर्त्यांना कोणतीही काळजी न करता तब्बल पाच वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट मिळू शकणार आहेत. यासह, iPhone च्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, Google आणि Samsung सारख्या कंपन्या त्यांच्या स्मार्टफोन्सना अपग्रेड आणि सिक्युरिटी पॅच कधी मिळतील हे आधीच ठरलेले आहे. Google आणि Samsung आपल्या स्मार्टफोन्समध्ये सात वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स देतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo