श्श! तुमच्या Android स्मार्टफोनमधील ‘या’ सिक्रेट फीचर्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का? दैनंदिन जीवन होईल सोपे 

श्श! तुमच्या Android स्मार्टफोनमधील ‘या’ सिक्रेट फीचर्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का? दैनंदिन जीवन होईल सोपे 
HIGHLIGHTS

Android स्मार्टफोन्समध्ये युजर्ससाठी अनेक उपयुक्त फीचर्स उपलब्ध आहेत.

या Android फीचर्समुळे तुमचे दैनंदिन जीवन अगदी सोपे होणार

जाणून घ्या Android स्मार्टफोन्समधील तीन सिक्रेट फीचर्स

आपणा सर्वांनाच माहिती आहे की, भारतीय युजर्स iOS पेक्षा Android स्मार्टफोन्सचा वापर अधिक करतात. पण, भारतीय युजर्समध्ये iPhone साठी आकर्षण काही औरंच असते. यासोबत येणाऱ्या अनेक ऍडव्हान्स्ड फीचर्समुळे तुमचे दैनंदिन जीवन सोपे होते. पण तुम्हाला माहीत आहे का? की, Android देखील आपल्या वापरकर्त्यांसाठी अशी अनेक उपयुक्त फीचर्स सादर करते, ज्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन खूप सोपे होईल. पण, बहुतेक क्वचितच युजर्सना या फीचर्सबद्दल माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला Android च्या अशाच सिक्रेट फीचर्सबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात फीचर्स-

Also Read: Google Pixel 9 सिरीज आज ग्लोबली होणार लाँच, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल LIVE इव्हेंट

W टाइप करून WhatsApp ओपन करा.

  • Android मध्ये कथित फीचर वापरण्यासाठी तुम्हाला आधी Settings मध्ये जावे लागेल.
  • यानंतर Shortcuts and Accessibility या पर्यायावर जा.
  • आता Smart Motion वर टॅप करून Smart Wake वर जा. येथे तुम्हाला ‘Draw W to launch WhatsApp’ हे टॉगल ऑन करावे लागेल.

यानंतर, जेव्हाही तुमचा फोन लॉक होईल, तेव्हा तुम्ही स्क्रीनवर फक्त W टाइप करून WhatsApp ओपन करण्यास सक्षम असाल. एवढेच नाही तर, तुम्ही याच फीचरद्वारे वरील प्रक्रियेनुसार ‘C’ टाईप करून कॉल देखील करू शकता. तर, तुम्ही M टाईप करून म्युझिक देखील ओपन करू शकता. त्याबरोबरच, F टाईप करून Facebook देखील ओपन करू शकता.

android smartphones tips and tricks
smartphones tips and tricks

Digital Wellbeing

डिजिटल वेलबीइंग फिचर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदतशीर ठरेल. डिजिटल युगात जिथे आपण सतत फोनमध्ये व्यस्त असतो, Android चा हा फिचर आपल्याला फोन बंद करून झोपायला जाण्याची सूचना देतो. यामध्ये तुम्ही तुमच्या झोपण्याची वेळ सेट करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे फीचर सेट केल्यानंतर काही वेळाने तुमचा फोन ब्लॅक अँड व्हाईट होतो, जो तुम्हाला झोपेची वेळेबद्दल सूचित करेल.

Google Assistant

Google Assistant बद्दल तर Android वापरकर्त्यांना माहितीच असेल. हे फीचर्स iPhone च्या Siri सारखे कार्य करते. तुमच्या Android फोनमध्ये गुगल असिस्टंट ॲक्टिव्हेट करून तुम्ही त्याद्वारे अनेक कामे पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ओके गुगल बोलून तुमची आज्ञा द्यावी लागेल. त्यानंतर, कॉल करण्यापासून तर अलार्म सेट करण्यापर्यंत सर्व काम Google Assistant तुमच्यासाठी करेल. यासह तुम्ही फोनवर करत असलेल्या सेटिंग्समध्ये वेळ वाया जाणार नाही, Google Assistant तुमच्यासाठी ते काम करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo