मोबाईल निर्माता कंपनी नोकियाच्या अॅनड्रॉईड आधारित फोन नोकिया C1ची काही छायाचित्रे समोर आली आहेत. हल्लीच असे ऐकायला मिळत होते की, नोकिया ब्रॅडच्या खाली एक अॅनड्रॉईड फोन लाँच केला जाऊ शकतो.
ह्या बातम्यांकडे पाहता, नोकिया अॅनड्रॉईड स्मार्टफोनसोबत २०१६च्या अखेरपर्यंत पुन्हा बाजारात येऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, नोकियाच्या अॅनड्रॉईड स्मार्टफोनचे नाव नोकिया C1 ठेवण्यात आलय. आणि आता ह्याला विकसित केले जात आहे.
नोकियाचा हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिमवर चालेल अशी माहिती मिळतेय. ह्या फोनमध्ये ५ इंचाची पुर्ण एचडी डिस्प्ले असेल. एवढंच नाही तर ह्या फोनमध्ये २जीबी रॅम असेल. त्याचबरोबर नोकिया C1 स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये इंटेलचे चिपसेट लावले असेल.
नोकियाचे सीईओ राजीव सूरींनी २०१४ मध्ये पद सांभाळल्यानंतर नोकियाला पुन्हा एकदा मोबाईल बाजारात आणण्याच्या दिशेने त्यांनी काम सुरु केले आहे. नोकिया अॅनड्रॉईड स्मार्टफोनसह २०१६ च्या अखेरपर्यंत बाजारात पुनरागमन करु शकतो.