Nokia 8 साठी आला एंड्राइड पाई चा स्टेबल अपडेट

Nokia 8 साठी आला एंड्राइड पाई चा स्टेबल अपडेट
HIGHLIGHTS

HMD ग्लोबल ने ट्वीटर वरून हि माहिती दिली आहे की Nokia 8 साठी नवीन OS अपडेट जारी केला गेला आहे.

महत्वाचे मुद्दे

  • HMD ग्लोबल ने ट्वीटर वरून केला खुलासा
  • आता नोकिया 8 ला मिळेल एंड्राइड पाई चा स्टेबल अपडेट
  • नोकियाच्या अनेक फोन्सना मिळाला आहे नवीन OS अपडेट

HMD ग्लोबल ने आपल्या Nokia 8 स्मार्टफोन साठी एंड्राइड 9 पाई चा स्टेबल अपडेट जारी केला आहे. हा अपडेट कंपनी नोव्हेंबरच्या शेवटी आणणार होती पण कारणास्तव कंपनी ने गेल्या आठवड्यात पाई बीटा अपडेट दिला होता. फिनलँड आधारित स्मार्टफोन निर्माता बेस्ट युजर एक्सपीरियंस साठी प्रतिबद्ध आहे. कंपनीचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर Juho Sarvikas ने ट्वीट करून याची माहिती दिली आहे की Nokia 8 ला एंड्राइड 9 पाई चा अपडेट दिला जात आहे.

HMD ने नुकतेच अनेक नोकिया फोन्स गूगलच्या लेटेस्ट एंड्राइड ऑपरेटिंग सिस्टम वर अपडेट केले आहेत पण Nokia 8 युजर्सना यासाठी खूप वाट बघावी लागली आहे.

एक वर्ष जुन्या Nokia 8 ला आता एंड्राइड पाई चा अपडेट मिळत आहे आणि हा अपडेट OTA च्या माध्यमातून जारी केला गेला आहे. HMD ने सांगितले आहे की हा अपडेट फेज पद्धतीने दिला जाईल. याचा अर्थ असा की Nokia 8 च्या काही यूनिट्सना आता नवीन अपडेट मिळू शकतो तर काहींना यासाठी वाट बघावी लागेल.

सॉफ्टवेयर एक्सपीरियंस बद्दल बोलायचे झाले तर, HMD आपल्या युजर्सना बेस्ट स्टॉक एंड्राइड इंटरफेस देते. Nokia चे अनेक फोन्स गूगलच्या एंड्राइड वन सॉफ्टवेयर वाई आधारित आहेत, आणि ब्लोटवेयर फ्री आहेत तसेच यांना रेगुलर सॉफ्टवेयर अपडेट, इम्प्रूवमेंट आणि बग फिक्सेज मिळत असतात.

नोकियाच्या या स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर या डिवाइस मध्ये एक 13-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर याच्या बॅक वर देण्यात आला आहे, जो फेज डिटेक्शन आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सह येतो. तसेच सेल्फी इत्यादीसाठी स्मार्टफोन मध्ये एक 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे, फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 835 चिपसेट आणि एक  3090mAh क्षमता असलेली बॅटरी पण देण्यात आली आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo