ह्या फोनला भारतात मागील वर्षी लाँच केले गेले होते. लाँचवेळी ह्याची किंमत १०,४९९ रुपये होती. आता हा स्मार्टफोन ऑनालाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर ९,९९९ रुपयाच्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी ऑनरने भारतात ऑनर 4X स्मार्टफोनला अॅनड्रॉईड मार्शमॅलोचे अपडेट देणे सुरु केले आहे. हा फोन भारतात मागील वर्षी लाँच केला होता. लाँचवेळी ह्याची किंमत १०,४९९ रुपये होती. आता हा स्मार्टफोन ऑनालाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर ९,९९९ रुपयाच्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने ही माहिती आपल्या ट्विटर अकाउंटद्वारा दिली आहे.
ऑनर 4X मध्ये 5.5 इंचाची IPS डिस्प्ले दिली आहे, ज्याचे HD रिझोल्युशन आहे. ह्यात प्लॅस्टिक बॅक देण्यात आली आहे. ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर, एड्रेनो 306 GPU आणि 2GB ची रॅम देण्यात आली आहे. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डने वाढवू शकतो.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. रियर कॅमे-यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्यात 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्यात दोन सिम स्लॉटसुद्धा आहेत. ह्यात वायफाय, ब्लूटुथ, मायक्रो-USB पोर्ट आणि GPS सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय देण्यात आले आहे.