काही महिन्यांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, नोकिया पुन्हा एकदा आपल्या नवीन स्मार्टफोनसह बाजारात पुनरागमन करणार आहे. त्याचबरोबर असेही समोर आले होते की हे स्मार्टफोन्स Finnish मॅन्युफॅक्चरर HMD ग्लोबल द्वारा बनवले जातील. आणि आता लवकरच नोकिया स्मार्टफोन बाजारात आपल्या काही नवीन अॅनड्रॉईड स्मार्टफोन्ससह बाजारात पुनरामन करेल असे दिसतेय.
आता आलेल्या नवीन बातमीनुसार, नोकियाचे आपल्या दोन स्मार्टफोन्सवर जोरदार काम सुरु आहे. ज्यात एक 5.2 इंचाची डिस्प्ले आणि दुस-यात 5.5 इंचाची डिस्प्ले असेल. दोन्ही स्मार्टफोन्स प्रिमियम मॅटेलिक डिझाईनसह येतील आणि ह्यात जुन्या नोकियाचाथोडा फिलही येईल.
ह्या स्मार्टफोन्समध्ये स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर असणार आहे. त्याचबरोबर हा IP68 प्रमाणित असेल, जेणे करुन हा अर्धा तास पाण्यात राहिला तरी खराब होणार नाही.
हेदेखील पाहा – केवळ १ रुपयात मिळणार शाओमी Mi 5, रेडमी नोट 3, Mi मॅक्स स्मार्टफोन
ह्याच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर ह्या स्मार्टफोन्समध्ये 5.2 इंच आणि 5.5 इंचाची डिस्प्ले असणार आहे.सूत्रांनुसार, ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची डिस्प्ले 2k रिझोल्युशनने सुसज्ज असेल.
हेदेखील पाहा – भारतात लवकरच होणार ह्या धमाकेदार बजेट स्मार्टफोन्सची एन्ट्री!!!
ह्या स्मार्टफोन्समध्ये 22.6MP चा रियर कॅमेरा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधीही हे स्मार्टफोन्स २०१६ च्या अखेरपर्यंत चीनमध्ये लाँच केले जातील, असे सांगण्यात येत होते मात्र आता हे २०१७ पहिल्या ३ महिन्यात लाँच केले जातील असे सांगण्यात येतय.
हेदेखील वाचा – एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी आणली “Happy Hours” ची भेट
हेदेखील वाचा – आयडियाने भारतात केली मोबाईल डाटाच्या किंमतीत खूप मोठी घट