Nokia 7 Plus साठी आला एंड्राइड 9 पाई चा स्टेबल अपडेट

Updated on 03-Oct-2018
HIGHLIGHTS

HMD ग्लोबल ने आपल्या Nokia 7 Plus मोबाईल फोन साठी लेटेस्ट एंड्राइड 9 पाई चा स्टेबल अपडेट आणला आहे, ज्याची माहिती कंपनीच्या चीफ प्रोडक्ट ऑफिसर ने ट्विटर वरून दिली आहे.

HMD ग्लोबल ने आपल्या वाद्यानुसार Nokia 7 Plus मोबाईल फोन साठी एंड्राइड 9 पाई चा अपडेट आणला आहे. आज कंपनीच्या चीफ प्रोडक्ट ऑफिसर ने ट्विटर वरून याची माहिती दिली आहे. हा अपडेट सप्टेंबरच्या सुरवातीला येणार होता पण गेल्या महिन्यात Nokia 6.1 Plus आणि 5.1 Plus च्या लॉन्च मुळे अपडेट थोडा उशिरा आणण्यात आला आहे. आता कंपनीने Nokia 7 Plus साठी एंड्राइड 9 पाई चा स्टेबल अपडेट आणला आहे.

https://twitter.com/sarvikas/status/1045599365593583617?ref_src=twsrc%5Etfw

अपडेट फेज पद्धतीने येईल की हा कम्प्लीट रोल आउट होईल याचा खुलासा Juho Sarvikas यांनी केला नाही. Nokia 7 Plus साठी आलेल्या एंड्राइड 9 पाई च्या स्टेबल अपडेट ची साइज 1471.3MB आहे.
जर तुम्ही Nokia 7 Plus यूजर असाल आणि तुम्हाला अपडेट डाउनलोड करायचा असेल तर या स्टेप्स फॉलो करा
सेटिंग्स – सिस्टम – अबाउट – फोन – चेक फॉर अपडेट
अपडेट चा वर्जन नंबर 3.22C आहे. अपडेट मिळाल्या नंतर इंस्टालेशन पूर्ण होण्याची वाट बघा. इंस्टालेशन पूर्ण झाल्यानंतर आपला मोबाइल फोन रिबूट करा. OTA च्या माध्यामातून Nokia 7 Plus वर अपडेट इंस्टाल केला जाऊ शकतो.
जर Nokia 7 Plus स्मार्टफोन बद्दल चर्चा करायची झाल्यास हा स्मार्टफोन भारतात एका 6-इंचाच्या 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. सोबतच हा स्मार्टफोन पण 6000 सीरीज च्या एल्युमीनियम ने बनवण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट मिळत आहे. हा स्मार्टफोन कार्ल झिस लेंस सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच कंपनी ने हा स्मार्टफोन लॉन्च करताना असा दावा केला आहे की नोकियाचा हा स्मार्टफोन 2 दिवसांची बॅटरी लाइफ देईल. हा स्मार्टफोन तुम्ही ब्लॅक कॉपर आणि वाइट कॉपर रंगात विकत घेऊ शकता.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :