मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने घोषणा केली आहे की, आज मोटोरोलाने मोटो X स्टाइल स्मार्टफोनमध्ये अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 6.0 मार्शमेलोचे अपडेट मिळणे सुरु होईल. मोटोरोलाने अशी माहिती दिली आहे की, मागील आठवड्यात भारतात मोटोरोला मोटो X स्टाइलला अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 6.0 मार्शमेलोचे अपडेट देणे सुरु केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोटोरोला मोटो X स्टाइलला मार्शमेलो अपडेट प्राप्त झाल्यानंतर ह्या स्मार्टफोनमध्ये डोज मोड, अॅप स्टँडबाय, एक्सपांडेबल स्टोरेज, डू नॉट डिस्टर्ब, नाऊ ऑन टॅप आदि वैशिष्ट्ये उपलब्ध होतील.
मोटोरोलाने आपल्या स्मार्टफोन्सची यादी जारी केली होती, ज्यात अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 6.0 मार्शमेलोचे अपडेट मिळेल. ह्या यादीत मोटोरोलो मोटो X स्टाइलचासुद्धा समावेश होता. मोटोरोलाद्वारा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 6.0 मार्शमेलोचे अपडेट दिल्या जाणा-या फोन्समध्ये मोटो X प्ले, मोटो टर्बो, मोटो G (3 जनरेशन), मोटो G (2 जनरेशन) आणि मोटो X(2 जनरेशन) यांचाही समावेश होता.
सप्टेंबरमध्ये गुगलने अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 6.0 मार्शमेलोला लाँच केले होते. नवीन ऑपरेटिंग सिस्टमसह आपल्याला फलोटिंग मेन्यू आणि डोजसारखे फीचर पाहायला मिळतील. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम ६.० मार्शमेलो आधीच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला असेल. तर अॅनड्रॉईडचे व्हॉईस असिस्टंट गुगल नाउ फीचरसुद्धा पहिल्यापेक्षा जास्त सटीक आणि अडव्हान्स झाला आहे.