Amazon Smartphone Holi Store Sale 2024: स्वस्त आणि महागड्या फोनवर प्रचंड Discount, बघा सर्वोत्तम ऑफर्स

Updated on 19-Mar-2024
HIGHLIGHTS

Amazon वर Smartphone Holi Store सेलची घोषणा करण्यात आली आहे.

अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे लोकप्रिय स्मार्टफोन्स मोठ्या सवलतींसह उपलब्ध

Amazon च्या होळी सेलदरम्यान Apple iPhone 13 वर विशेष सूट मिळत आहे.

होळी सणाला आता फक्त काही दिवस उरले आहेत. या निमित्त अनेक ठिकाणी होळी स्टोअर सेल देखील सुरु केले आहेत. यामध्ये ई-कॉमर्स वेबसाइट्सनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सवलत आणि डील जाहीर केल्या आहेत. Amazon India ने आधीच आपल्या Amazon Smartphone Holi Store सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे लोकप्रिय स्मार्टफोन्स मोठ्या सवलतींसह उपलब्ध असतील. चला तर मग बघुयात लोकरीप्रिय स्मार्टफोन्सवरील सर्वोत्तम सवलती-

हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy F15 5G फोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी, Flipkart वर Best ऑफर उपलब्ध। Tech News

Apple iPhone 13 वरील डिस्काउंट

iPhone 13

Amazon च्या होळी सेलदरम्यान Apple iPhone 13 वर विशेष सूट मिळत आहे. सध्या तुम्ही हा फोन Amazon India वरून 17% डिस्काउंटसह 49,499 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये 6.1-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. iPhone 13 मध्ये A15 बायोनिक चिप उपलब्ध आहे. तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12MP डुअल कॅमेरा आणि 12MP सेल्फी कॅमेरा देखील आहे.

iQOO Z9 वरील डिस्काउंट

iQOO Z9 नुकताच भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा फोन होळी स्टोअर सेलमध्ये 19,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. सेलदरम्यान फोनवर सुमारे 20% सूट दिली जात आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50MP Sony IMX882 कॅमेरा आहे, जो OIS सह येतो. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

Honor X9b details

Honor X9b वरील डिस्काउंट

Honor X9b तुम्ही Amazon India वरून होळी स्टोअर सेलमध्ये 16% सूटसह 25,999 रुपयांना उपलब्ध आहे. Honor X9b नुकतेच एका खास फीचरसह सादर करण्यात आले आहे. हा फोन अगदी मजबूत बॉडीसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 108MP वाइड कॅमेरा, 5MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो लेन्स देखील आहेत. फोनच्या पुढील बाजूस 16MP सेल्फी कॅमेरा देखील आहे.

iQOO Neo 9 Pro वरील डिस्काउंट

iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन होळी सेलदरम्यान Amazon India वर फोनवर 10% डिस्काउंटसह मिळत आहे. हा फोन 37,999 रुपयांना साईटवर सूचिबद्ध करण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर फोनमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 12GB रॅम देखील आहे. याशिवाय, फोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप देखील आहे, फोन 50MP Sony IMX920 सेन्सरसह येतो. फोनमध्ये 5160mAh ची बॅटरी देखील आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :