SAMSUNG च्या जबरदस्त फोनसह AMAZON PRIME मेंबरशिप मोफत! 10,000 रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा

SAMSUNG च्या जबरदस्त फोनसह AMAZON PRIME मेंबरशिप मोफत! 10,000 रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M32 चे नवीन प्राइम एडिशन

या नव्या फोनसह विनामूल्य AMAZON PRIME मेंबरशिप

Galaxy M32 फक्त 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.

प्रसिद्ध टेक कंपनी Samsung ची M-सीरीज भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहे. कंपनीचे पावरफूल बॅटरी स्मार्टफोन Samsung Galaxy M32 चे नवीन प्राइम एडिशन Amazon India च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या मॉडेलचे अपग्रेड म्हणून, ग्राहक मोठ्या सवलतीत Galaxy M32 प्राइम एडिशन खरेदी करू शकतात.

हे सुद्धा वाचा : दिवाळीनिमित्त सर्वात मोठी ऑफर! OnePlus 5G फोनवर मिळतेय तब्बल 27,200 रुपयांपर्यंत सूट

नवीन Galaxy M32 प्राइम एडिशनचे स्पेसिफिकेशन्स रेगुलर Galaxy M32 सारखेच आहेत, परंतु यासोबत Amazon Prime सदस्यत्व विनामूल्य उपलब्ध असणार  आहे. या डिव्हाइससह, कंपनी तीन महिन्यांची प्राइम मेंबरशिप ऑफर करत आहे. मात्र या ऑफरचा फायदा फक्त त्या ग्राहकांनाच मिळेल, जे आधीपासून प्राइम मेंबर नाहीत.

 10,000 रुपयांच्या आत फोन खरेदी करा 

Samsung ने Galaxy M32 प्राइम एडिशन दोन व्हेरिएंटमध्ये आणले आहे. त्यापैकी पहिल्यामध्ये 4GB + 64GB स्टोरेज आणि दुसऱ्यामध्ये 6GB + 128GB स्टोरेज उपलब्ध असेल. या दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 11,499 रुपये आणि 13,499 रुपये आहे. प्राइम ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये हा डिव्हाईस खरेदी करण्याचा पर्याय आहे.

 निवडक बँकांकडून क्रेडिट कार्ड वापरून फोन खरेदी केल्यास आणि EMI द्वारे पैसे भरल्यास 1,500 रुपयांची अतिरिक्त सूट असेल. या ऑफरसह, Galaxy M32 फक्त 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.

Galaxy M32 Prime Edition चे स्पेसिफिकेशन्स 

Galaxy M32 Prime Edition मध्ये Infinity-U नॉचसह 6.4-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. 90Hz रिफ्रेश रेट ऑफर करणारा हा डिस्प्ले 800nits ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देतो. यामधील 6,000mAh बॅटरी 18W चार्जिंग सपोर्टसह येते. डिव्हाइसमध्ये साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर, नवीन डिवाइसमध्ये 20MP सेल्फी कॅमेरा आहे. मागील पॅनलवर 64MP मुख्य कॅमेरा सेन्सर व्यतिरिक्त, 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहेत. डिव्हाइसमध्ये Android 11 आधारित OneUI 4.1 सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. MediaTek Helio G80 चिपसेटसह फोनमध्ये 4GB रॅम उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo