Amazon ने या वर्षाच्या सुरुवातीला कमी किमतीत Amazon Prime Lite मेंबरशिप सादर केली होती. या मेंबरशिपमध्ये ग्राहकांना प्राइम मेंबरशिपसारखेच बेनिफिट्स मिळतील. दरम्यान, प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता Amazon India ने Prime Lite मेंबरशिपची किंमत कमी केली आहे. पूर्वी या मेंबरशिपसाठी तुम्हाला 999 रुपये खर्च करावे लागत होते. जाणून घेऊयात या प्लॅनची नवी किंमत-
हे सुद्धा वाचा: Lava Storm 5G Launched: 50MP कॅमेरा आणि Best फीचर्ससह जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी। Tech News
वर सांगितल्याप्रमाणे, Amazon Prime Lite सदस्यत्वासाठी तुम्हाला 999 रुपयांऐवजी 799 रुपये द्यावे लागणार आहे. खुशखबर म्हणजे कंपनीने आपल्या Prime Lite मध्ये उपलब्ध असलेल्या बेनिफिट्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही Amazon च्या वेबसाइट, मोबाइल किंवा Android आणि iOS Apps द्वारे प्राइम लाइट मेंबरशिपसाठी साइन अप करू शकता.
Prime च्या तुलनेत Lite वर्जनमध्ये तुम्हाला कमी बेनिफिट्स मिळतात. यापैकी काहींमध्ये वन डे डिलिव्हरी, सेम डे डिलिव्हरी, प्राइम रीडिंग कॅटलॉगचा ऍक्सेस, प्राइम म्युझिक आणि जाहिरातमुक्त Prime Video यांचा समावेश आहे.
यामध्ये तुम्हाला ‘प्राइम ऍडवांटेज’ देखील मिळत नाही, ज्यामध्ये तुम्हाला नो कॉस्ट EMI आणि सहा महिने मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट मिळते. याशिवाय, Amazon Prime मोफत इन-गेम कंटेंट आणि Amazon फॅमिली ऑफरसह येतो.
Amazon Prime Lite चे बेनिफिट्स पुढीलप्रमाणे आहेत: