digit zero1 awards

Good News! Amazon Prime Lite मेंबरशिपची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत आणि बेनिफिट्स। Tech News 

Good News! Amazon Prime Lite मेंबरशिपची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत आणि बेनिफिट्स। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon India ने Prime Lite मेंबरशिपची किंमत कमी केली आहे.

पूर्वी Prime Lite मेंबरशिपची किंमत 999 रुपये इतकी होती.

Amazon Prime Lite सदस्यत्व तुम्हाला Prime Video मध्ये देखील ऍक्सेस देतो.

Amazon ने या वर्षाच्या सुरुवातीला कमी किमतीत Amazon Prime Lite मेंबरशिप सादर केली होती. या मेंबरशिपमध्ये ग्राहकांना प्राइम मेंबरशिपसारखेच बेनिफिट्स मिळतील. दरम्यान, प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता Amazon India ने Prime Lite मेंबरशिपची किंमत कमी केली आहे. पूर्वी या मेंबरशिपसाठी तुम्हाला 999 रुपये खर्च करावे लागत होते. जाणून घेऊयात या प्लॅनची नवी किंमत-

हे सुद्धा वाचा: Lava Storm 5G Launched: 50MP कॅमेरा आणि Best फीचर्ससह जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी। Tech News

Amazon Prime Lite मेंबरशिपची नवी किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, Amazon Prime Lite सदस्यत्वासाठी तुम्हाला 999 रुपयांऐवजी 799 रुपये द्यावे लागणार आहे. खुशखबर म्हणजे कंपनीने आपल्या Prime Lite मध्ये उपलब्ध असलेल्या बेनिफिट्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही Amazon च्या वेबसाइट, मोबाइल किंवा Android आणि iOS Apps द्वारे प्राइम लाइट मेंबरशिपसाठी साइन अप करू शकता.

Amazon Prime Lite price cut

Amazon Prime Lite चे बेनिफिट्स

Prime च्या तुलनेत Lite वर्जनमध्ये तुम्हाला कमी बेनिफिट्स मिळतात. यापैकी काहींमध्ये वन डे डिलिव्हरी, सेम डे डिलिव्हरी, प्राइम रीडिंग कॅटलॉगचा ऍक्सेस, प्राइम म्युझिक आणि जाहिरातमुक्त Prime Video यांचा समावेश आहे.

यामध्ये तुम्हाला ‘प्राइम ऍडवांटेज’ देखील मिळत नाही, ज्यामध्ये तुम्हाला नो कॉस्ट EMI आणि सहा महिने मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट मिळते. याशिवाय, Amazon Prime मोफत इन-गेम कंटेंट आणि Amazon फॅमिली ऑफरसह येतो.

Amazon Prime Lite चे बेनिफिट्स पुढीलप्रमाणे आहेत:

  • Amazon Prime Lite सदस्यांना दोन दिवसांची फ्री डिलिव्हरी आणि कोणत्याही किमान ऑर्डरशिवाय स्टॅंडर्ड डिलिव्हरी मिळते.
  • Amazon Prime Lite सदस्य ज्यांच्याकडे Amazon Pay किंवा ICICI बँक क्रेडिट कार्ड आहे, ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर केलेल्या खरेदीवर 5% कॅशबॅक मिळवू शकतात.
  • Amazon Prime प्रमाणे, Lite सदस्यत्व देखील तुम्हाला Prime Video मध्ये ऍक्सेस देते. प्राइम व्हिडिओवर उपलब्ध असलेली कोणताही कंटेंट तुम्ही HD कॉलिटीमध्ये आणि जाहिरातींसह दोन उपकरणांवर पाहू शकता.
  • Amazon Prime Lite सदस्यांना लाइटनिंग डील, विशेष लाइटनिंग डील आणि डील्स ऑफ द डे चा लवकर ऍक्सेस मिळेल.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo