Amazon Prime Day Sale 2024: सेलदरम्यान लेटेस्ट स्मार्टफोन्सवर होणार ऑफर्सचा वर्षाव, प्रसिद्ध ब्रँड्सचे फोन्स उपलब्ध 

Amazon Prime Day Sale 2024: सेलदरम्यान लेटेस्ट स्मार्टफोन्सवर होणार ऑफर्सचा वर्षाव, प्रसिद्ध ब्रँड्सचे फोन्स उपलब्ध 

अलीकडेच Amazon Prime Day सेल 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने 20 जुलै आणि 21 जुलै रोजी हा सेल आयोजित केला आहे. या दोन दिवसाच्या सेलमध्ये अनेक ऑफर्स मिळणार आहेत. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक उपकरणे इ. सर्व श्रेणींमध्ये प्रचंड सवलत आणि ऑफर मिळणार आहेत. जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर या Amazon सेलमध्ये Samsung Galaxy S23 Ultra, Oppo F27 Pro+, iQOO Z9 5G आणि इतर काही फोनवर 60% पर्यंत सूट मिळेल. बघुयात ऑफर्स-

Also Read: 4GB RAM सह स्वस्त POCO C61 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 6000 रुपयांपेक्षा कमी

Oppo F27 Pro+

oppo f27 pro in amazon prime day sale

Oppo F27 Pro+ हा स्मार्टफोन कंपनीने अलीकडेच लाँच केला आहे. लक्षात घ्या की, हा इंडस्ट्रीतील पहिला फोन आहे, जो IP69 सर्टिफिकेशनसह येतो. हा फोन Amazon India वर जवळपास 27,999 रुपयांमध्ये डिस्काउंटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. Amazon प्राइम डे सेल 2024 मध्ये मोठ्या सवलती आणि ऑफर्स मिळतील. Amazon प्राइम वापरकर्ते हा फोन 15% च्या सवलतीत खरेदी करू शकतात. त्याबरोबरच, यासह एक्सचेंज ऑफर देखील मिळेल.

Samsung Galaxy A34 5G

Samsung Galaxy A34 5G
Samsung Galaxy A34 5G

Samsung Galaxy A34 5G हा फोन प्राइम डे सेलमध्ये खूप स्वस्त मिळणार आहे. यावर उत्तम डील्स आणि ऑफर मिळत आहेत. हा फोन सध्या Amazon India वर 35,499 रुपयांना सूचिबद्ध आहे. या फोनवर तुम्हाला या किंमतीवर 35% ची सूट दिली जात आहे. त्यानंतर हा फोन 22,999 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय, तुम्हाला फोनवर HDFC बँक क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांची सूट मिळणार आहे.

iQOO Z9 5G

iQOO Z9 Lite 5G
#iQOO Z9 Lite 5G

iQOO Z9 5G फोनची मूळ किंमत 24,999 रुपये आहे, परंतु हा फोन सध्या Amazon India वर फक्त 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनवर 20% सूट आहे. याशिवाय, ICICI बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला सुमारे 2000 रुपयांची झटपट सूट मिळू शकते. हा फोन प्राईम डे सेलदरम्यान अनेक सवलतींसह मिळणार आहे.

Redmi 13C 5G

Amazon च्या प्राइम डे सेलदरम्यान तुम्ही Redmi 13C 5G खरेदी करू शकता. यावेळी तुम्हाला या फोनच्या मूळ किंमतीवर 25% ची सूट मिळत आहे. या फोनची खरी किंमत सुमारे 13,999 रुपये आहे. जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर, तुम्ही 10499 रुपयांना खरेदी करू शकता. त्याबरोबरच, फोनवर 9700 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे. तुम्हाला प्राइम डे सेलमध्ये फोनवर अनेक सवलती मिळणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo