2023 हा वर्ष संपायला केवळ काही दिवस उरले आहेत. दरम्यान, अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी Year End Sale ची घोषणा केली आहे. सेलदरम्यान, ब्रँडचे स्मार्टफोन्स डिस्काउंट ऑफर्ससह अतिशय स्वस्तात खरेदी करता येतील. या यादीत आपल्या देशी कंपनीचे नाव देखील जुळले आहे. होय, Lava year end सेल आजपासून म्हणजेच 26 डिसेंबरपासून ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वर सुरू झाला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेलमध्ये Lava च्या टॉप क्लास स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, परवडणारी EMI आणि मजबूत एक्सचेंज ऑफर देखील डिव्हाइसवर उपलब्ध आहेत. जर तुम्ही लावा मोबाईल फोन घेण्याचा विचार करत असाल तर हीच तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. बघुयात स्मार्टफोन्सवरील ऑफर्स.
Lava Blaze 2 5G स्मार्टफोन अगदी प्रीमियम लुकसह अलीकडेच लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 11,999 रुपयांना Amazon वर सूचिबद्ध आहे. बँक ऑफर्समध्ये क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास 1500 रुपयांची सूट मिळेल. तर, नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंच लांबीचा पंच होल HD+ डिस्प्ले आहे. यात MediaTek Dimensity 6020 चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी, हँडसेटमध्ये LED हेडलाइटसह 50MP AI कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी, 8MP कॅमेरा प्रदान केला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Lava Agni 2 5G हा कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. हा फोन लाँच होताच अधिक लोकप्रिय झाला. या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये आहे. सेलदरम्यान, यावर 1000 रुपयांची बँक सूट आणि 970 रुपयांची EMI ऑफर दिली जात आहे. तर, फोनवर 18,950 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. येथून खरेदी करा
या डिव्हाइसमध्ये 6.78 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले आहे. यात MediaTek Dimensity 7050 चिपसेट आणि 50MP रियर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 16MP कॅमेरा आहे. या फोनची बॅटरी 5000mAh आहे, जी 66W फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येईल.
Lava Blaze 5G हा या यादीतील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 9,499 रुपये आहे. सेलदरम्यान, Amazon कडून या फोनवर 750 रुपयांची बँक सूट आणि 451 रुपयांची EMI दिली जात आहे. जर तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंज करण्यासाठी असेल तर, यावर तुम्ही 8800 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. येथून खरेदी करा
Lava Blaze 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच लांबीचा HD प्लस डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 700 ऑक्टा-कोर प्रोसेसर देखील आहे. यात व्हर्च्युअल रॅमसह 128GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये देखील 5000mAh बॅटरी मिळेल, ही बॅटरी वेब सर्फिंगसारखा बेसिक कार्यांसह दोन दिवस चालेल.