Amazon Kickstart Deals लाईव्ह! OnePlus, Redmi फोन्स कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, पहा ऑफर्स

Updated on 23-Sep-2024
HIGHLIGHTS

27 सप्टेंबरपासून Amazon Great Indian Festival Sale 2024 लाइव्ह होणार

सेल सुरू होण्यापूर्वीच Amazon वर Kickstart Deals लाईव्ह

OnePlus, Redmi आणि Oppo फोन्स भारी सवलतीसह खरेदी करण्याची संधी

येत्या 27 सप्टेंबरपासून वर्षातील सर्वात मोठा सेल Amazon Great Indian Festival Sale 2024 लाइव्ह होणार आहे. मात्र, सेल सुरू होण्यापूर्वीच Amazon वर Kickstart Deals लाईव्ह झाले आहेत. यामध्ये सध्या फ्लॅगशिप किलर OnePlus, Redmi आणि Oppo फोन्स भारी सवलतीसह खरेदी करण्याची संधी आहे. होय, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम Kickstart Deals बद्दल माहिती देणार आहोत. पाहुयात यादी-

Redmi Note 13 5G

Redmi Note 13 5G

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi चा Redmi Note 13 5G फोन Kickstart Deals मध्ये स्वस्तात उपलब्ध आहे. या फोनची किंमत 16,998 रुपये आहे. SBI बँकेच्या डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. फोनवर 824 रुपयांची EMI दिली जात आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, याशिवाय, हँडसेटमध्ये 6.67-इंच लांबीचा poOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये Mediatek Dimensity 6080 प्रोसेसर मिळेल. तर, फोटोग्राफीसाठी 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

OPPO F27 Pro+ 5G

या स्मार्टफोनची किंमत Amazon वर 29,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनवर SBI बँक क्रेडिट कार्ड खरेदीवर 1500 रुपयांची सूट मिळणार आहे. त्याबरोबरच, या हँडसेटवर 27,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, OPPO F27 Pro+ मध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED कर्व डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह आहे. फोटोग्राफीसाठी, यात 64MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर उत्तम परफॉर्मन्ससाठी उपलब्ध आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

OnePlus 11R 5G

लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus 11R देखील किकस्टार्टर्स डील्समध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत 27,998 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1500 रुपयांची बँक सवलत दिली जात आहे. तर फोनवर 1,357 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळेल. खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :