Holiday Phone Fest: वर्षातील शेवटच्या सेलमध्ये महागडे स्मार्टफोन्स मोठ्या Discount सह खरेदीची संधी, पहा यादी
सध्या Amazon वर Holiday Phone Fest सेल सुरू आहे.
Realme ने Realme GT 7 Pro स्मार्टफोन नुकतेच भारतात लाँच केला आहे.
या फोनमध्ये नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर देखील मिळेल.
Holiday Phone Fest: सध्या Amazon वर Holiday Phone Fest सेल सुरू आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा सेल 25 डिसेंबरपासून सुरू झाला असून 2 जानेवारीपर्यंत लाईव्ह असेल. Amazon ने अगदी विशेष निमित्त पाहून हा फोन फेस्ट लाईव्ह केला आहे. तुम्ही देखील नवीन वर्षाच्या मुहूर्तावर स्वतःसाठी नवीन प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर हा सेल तुमच्यासाठी अनेक सोनेरी डील्स घेऊन आला आहे. चला तर मग पाहुयात Holiday Phone Fest मधील महागड्या आणि लोकप्रिय स्मार्टफोन्सवरील डील्स-
Also Read: 64MP Camera Smartphones under 30000: परवडणाऱ्या किमतीत मिळतील अप्रतिम कॅमेरा फीचर्स, पहा यादी
Realme GT 7 Pro
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme GT 7 Pro स्मार्टफोन नुकतेच भारतात लाँच केला आहे. या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Amazon वर 69,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 3000 रुपयांची सूट मिळेल. या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6500mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.
iQOO 13 5G
iQOO कंपनीचे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. कंपनीने हा स्मार्टफोन याच महिन्याच्या सुरुवातीला भारतात लाँच केला. iQOO 13 5G फोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 66,999 रुपये आहे.मात्र, सध्या हा फोन 59,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. तर हा फोन देखील नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि पॉवर बॅकअपसाठी 6000mAh बॅटरी यात मिळेल.
HONOR 200 5G
Honor चा हा HONOR 200 5G स्मार्टफोन बेस्ट सेलर आहे. या फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 3000 रुपयांचे डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि पॉवर बॅकअपसाठी यात 5200mAh बॅटरी आहे. हे बॅटरी 100W च्या समर्थनासह येते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile