Amazon Great Republic Day Sale 2025 प्राईम मेम्बर्ससाठी सुरु! ‘या’ फोन्सवर मिळतेय भारी सूट, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी
Amazon Great Republic Day Sale 2025 अखेर प्राईम मेम्बर्ससाठी सुरु
सेलदरम्यान SBI कार्ड पेमेंट व्यवहारांवर 10% सूट मिळेल.
अखेर सेलमध्ये बजेट स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या ऑफर लाइव्ह
Amazon Great Republic Day Sale 2025: नवीन वर्षातील सर्वात मोठी सेल Amazon Great Republic Day Sale 2025 अखेर प्राईम मेम्बर्ससाठी सुरु झाली आहे. ही सेल सर्वांसाठी उद्या 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेलदरम्यान स्मार्टफोनसोबतच इतर अनेक उत्पादनांवरही जोरदार सूट मिळणार आहे. अखेर सेलमध्ये स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या ऑफर लाइव्ह झाले आहेत. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या पॉवरफुल स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत. सेलदरम्यान SBI कार्ड पेमेंट व्यवहारांवर 10% सूट मिळेल. पहा यादी-
Also Read: आगामी Samsung Galaxy S25 सिरीजची लाँचपूर्वीच Price Leak! तुमच्या बजेटमध्ये बसतील का स्मार्टफोन?
Samsung Galaxy M35 5G
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चा नवा फोन Samsung Galaxy M35 5G अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. हा सॅमसंगचा बेस्ट सेलिंग बजेट स्मार्टफोन आहे. सध्या सेलमध्ये 13,999 रुपयांना खरेदी करता येईल. यावर तुम्हाला बँक ऑफर्स, EMI, कॅशबॅक इ. सर्व ऑफर्स मिळतील. हँडसेटमध्ये 8GB पर्यंत RAM सह 256GB पर्यंत स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी सोबत 50MP मुख्य कॅमेरा आणि इन-हाउस Exynos 1380 प्रोसेसर आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
POCO X6 Neo 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता POCO X6 Neo 5G फोनची सध्याची किंमत 12,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, सेलमध्ये हा फोन 10,999 रुपयांना उपलब्ध होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या सेलमध्ये निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास मोठी सवलत उपलब्ध आहे. तसेच, EMI, कॅशबॅक इ. देखील मिळतील. तर, हँडसेटमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
iQOO Z9s 5G
लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता iQOO ने iQOO Z9s 5G सेलमध्ये हा फोन 17,999 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, नेहमी या फोनची किंमत 19,999 रुपयांपासून सुरू होते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये बँक ऑफर्स, EMI, कॅशबक इ. ऑफर्स देखील मिळेल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये Dimesity 7300 5G प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनमध्ये 44W फ्लॅश चार्ज सपोर्ट आणि 50MP मुख्य कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Realme Narzo 70x 5G
Realme Narzo 70x 5G स्मार्टफोनची किंमत Amazon वर 12,998 रुपयांपासून सुरू होते. आहे. फोनचा टॉप व्हेरिएंट 13,998 रुपयांना येतो. तुम्ही हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये आइस ब्लू, ब्लू आणि ग्रीन यांचा समावेश आहे. स्मार्टफोन Amazon सेलमध्ये 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. फोनवर मासिक हप्ता आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, वरील सर्व प्रोडक्ट्सच्या किमती सेलदरम्यान जवळपास बदलत राहण्याची शक्यता आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile